पुणे

Pune Traffic Update : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग रोहिदास पवार यांनी दिले निर्देश

Pune Police Gives Traffic Update : वाहतूक कोंडी, विकासाचे काम यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्यामुळे पोलीस उप‌-आयुक्त यांनी दिले निर्देश

पुणे :- पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांचे संख्येमध्ये झालेली वाढ व त्या प्रमाणात रस्त्यांची न झालेली वाढ,त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची वाढलेली घनता, यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होवून, जड वाहनांमुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे तसेच विविध मोठे प्रकल्प (मेट्रो, उड्डाणपूल, विविध विकास कामे) सुरु असल्यामुळे रस्त्यावरील जागा मोठ्या प्रमाणावर व्यापली जाऊन वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना मोठाधोका व गैरसोय होते.रोहिदास पवार, पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, पुणे शहर, वाहतूकी संदर्भात नव्याने आदेश दिले आहे. Pune Traffic Update

पुणे शहरामधुन सोलापूर रोड, अहमदनगर रोड, सातारा रोड, मुंबई रोड, नाशिक रोड, सासवड रोड, पौड रोड, आळंदी रोड व इतर रस्त्यांवरून पुणे शहरामधुन मार्गक्रमण करून दुसऱ्या शहराकडे जाणारी व येणारी सर्व प्रकारची जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक व इतर वाहनांनी (अत्यावश्यक सेवेतील वाहने, पब्लीक ट्रान्सपोर्ट बसेस, इत्यादी वगळून) येताना व जाताना खालील मार्गाचा वापर करावा, या व्यतिरीक्त पुणे शहरामधील अन्य मार्ग वापरण्यास पुर्ण वेळ बंदी आहे. याकरीता तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर खालील प्रमाणे नव्याने आदेश निर्गमीत करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी असलेले वाहतूकीचे सर्व आदेश रद्द समजण्यात येतील. Pune Traffic Update

23 मार्च रोजी पासुन सकाळी 08.00 ते 10.00 पर्यंत प्रवेश बंद असलेले मार्ग (रात्री 10 ते सकाळी 08.00 वा. पर्यंत प्रवेश आहे)

1.अहमदनगर रोडवरून पिंपरी चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पुल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पुल मार्ग,

पर्यायी मार्ग :- वाहन चालकांनी शिक्रापूर, चाकण, तळेगाव मार्गे इच्छितस्थळी जावे.

2.अहमदनगर रोडवरून साताराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, सासवड रोडने मंतरवाडी फाटा चौक, खड़ी मशीन चौक, कात्रज चौक मार्ग

पर्यायी मार्ग :- वाहन चालकांनी लोणीकंद, केसनंद, थेऊर, थेऊर फाटा मार्गे इच्छितस्थळी जावे. > उपलब्ध पर्यायी मार्ग वाहन चालकांनी शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला, लोणंद किंवा सुपा, जेजूरी‌ मार्गे इच्छितस्थळी जावे.

3.अहमदनगर रोडवरून सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, हडपसर मार्ग उपलब्ध

पर्यायी मार्ग :- वाहन चालकांनी शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला मार्ग इच्छितस्थळी जावे,

4.सोलापूर रोडवरून साताराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मंतरवाडी फाटाचौक, खडी मशीनचीक, कात्रजचौक मार्ग
उपलब्ध

पर्यायी मार्ग :- वाहन चालकांनी केडगाव चौफुला, लोणंद मार्गे इच्छितस्थळी जावे.

5.सोलापूर रोडवरून अहमदनगर व नाशिककडे जाणाऱ्या व येणान्या वाहनांकरीता हडपसर, मगरपट्टा रोड, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पुल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पुल मार्ग

पर्यायी मार्ग :- वाहन चालकांनी थेऊर फाटा, थेऊर, केसनंद, लोणीकंद, शिक्रापुर मार्गे इच्छितस्थळी उपलब्ध पर्यायी मार्ग वाहन चालकांनी केडगाव चौफुला, नाव्हरा, शिरूर मार्गे इच्छितस्थळी जावे.

पुणे शहरामधील अंतर्गत रस्त्यावर जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर,

जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी (अत्यावश्यक सेवेतील वाहने, पब्लीक ट्रान्सपोर्ट बसेस, इत्यादी वगळून) तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर खालील प्रमाणे नव्याने आदेश निर्गमीत करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी असलेले वाहतूकीचे सर्व आदेश रद्द समजण्यात येतील.

(अ) २४ तास प्रवेश बंद असलेले रस्ते

१. मंगलदास रोड-ब्ल्यु डायमंड चौक ते सर्किट हाऊस चौक २. रेंजहिल्स् रोड पोल्ट्री फार्म चौक ते रेजहिल्स् कॉर्नर चौक

३. सर मानेकजी मेहता रोड काहुन रोड जंक्शन ते कॉन्सिल हॉल चौक

४. पुणे स्टेशन रोड जहांगीर हॉस्पिटल चौक ते अलंकार सिनेमा चौक

(ब) ०८:०० ते २२:०० वा. पर्यंत प्रवेश बंद असलेले रस्ते

१. कोरेगाव पार्क रोड नॉर्थ मेन रोड ताडीगुत्ता चौक ते कोरेगाव पार्क जंक्शन

(क) ०८:०० ते ११:०० व १६:०० ते २२:०० वा. पर्यंत प्रवेश बंद असलेले चौक

१. संचेतीचौक जंगली महाराज रोड, गणेशखिंड रोड

२. पीड फाटाचौक-कर्वे रोड, डेक्कनकडे, लॉ कॉलेज रोड

३. राजाराम पुल डी.पी. रोडकडे ४ . दांडेकर पुल शास्त्री रोडकडे

५. सावरकर पुतळा चौक चाजीराव रोडकडे

६. पॉवर हाऊसचौक मालधक्का चौकाकडे

७. पोल्ट्री फार्मचौक आर.टी.ओ. चौकाकडे

८. पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रोडकडे

९. खाणे मारूती चौक इस्ट स्ट्रीटकडे १०. लक्ष्मी नारायण सिनेमा चौक जेधे चौकाकडे

११. ब्रेमेन चौक : पुणे विद्यापीठ चौकाकडे

१२. अभिमान श्री बाणेर चौक पुणे विद्यापीठ चौकाकडे पुणे विद्यापीठ चौकाकडे

१३. अभिमान श्री पाषाण चौक १४. सिंफनी सर्कल गणेशखिंड रोडकडे

१५. सेव्हन लव चौक जेधे चौकाकडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0