Uncategorized

Prasad Lad : भाजप आमदार प्रसाद लाड यांचे ट्विट ; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या साधला निशाणा

Prasad Lad Tweet On Aditya Thackeray : भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी करत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर साधला निशाणा

मुंबई :- भाजप आमदार प्रसाद लाड Prasad Lad यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. या व्यंगचित्रातून प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.व्यंगचित्रात उद्धव ठाकरे यांच्या हातात आदित्य ठाकरे यांचा फोटो दाखवण्यात आलाय. “आमच्या आदित्यला पाहिले का हो तुम्ही कुठे? ऐन निवडणुकीच्या काळात गेले दीड महिने गायब आहे हो…”, असं उद्धव ठाकरे व्यंगचित्रात विचारत असल्याचं दाखवण्यात आलंय. तर इतर दोन जण “दारुण पराभव समोर दिसत असल्यामुळे लपून बसला असेल…”, असं बोलताना व्यंगचित्रात दाखवलं आहे. Prasad Lad Tweet On Aditya Thackeray

बाळराजे बसले कुठे दडून? प्रसाद लाड यांचा टोला

हे व्यंगचित्र ट्विट करत असताना प्रसाद लाड Prasad Lad यांनी कॅप्शनमधूनही आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. “बाळराजे बसले कुठे दडून? मागील काही दिवसांपासून न कुठली प्रेस कॉन्फरन्स ना कुठली सभा. बाबांच्या मागे मागे चालणाऱ्या बाळराजांना अहो कुठेतरी शोधा”, असा खोचक टोला प्रसाद लाड यांनी दिला आहे. त्यांच्या या व्यंगचित्रावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Prasad Lad Tweet On Aditya Thackeray

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0