महाराष्ट्र

Rahul Gandhi : “पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरतात!” रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावरून राहुल गांधींचा खोचक हल्ला

•राहुल गांधींचा एक्सवरून हल्लाबोल: “टॅरिफ वाढ आणि भारत-पाक मध्यस्थीच्या दाव्यानंतरही मोदी ट्रम्प यांचे अभिनंदन करत राहिले”

ANI :- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक मोठा दावा केला. रशियाकडून तेलाची आयात थांबवण्यासंदर्भात मोदींनी आपल्याला शब्द दिला असल्याचे ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर देशातील राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात,” अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

ट्रम्प यांचा नेमका दावा काय?

व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की, रशियाकडून तेलाची आयात थांबवावी यासाठी मी पंतप्रधान मोदींना समजविण्याचा प्रयत्न केला. “माझ्या मित्राने (पंतप्रधान मोदींनी) रशियाकडून तेलाची आयात थांबविण्याचा शब्द दिला आहे,” असे ट्रम्प म्हणाले. हा निर्णय लगेच होणार नसला तरी त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले होते.

राहुल गांधींचे एक्सवरून टीकास्त्र

ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर राहुल गांधी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. त्यांनी पाच घटनांचा उल्लेख करत मोदींवर टीका केली.

राहुल गांधी यांनी खालील कारणे दिली आहेत.

1.भारत रशियन तेल खरेदी करणार की नाही, हे ठरविण्याची आणि जाहीर करण्याची ट्रम्प यांना परवानगी दिणे.

2.ट्रम्प वारंवार अवहेलना करत असूनही त्यांना अभिनंदनाचे संदेश पाठवणे.

3.अर्थमंत्र्यांचा अमेरिकेचा दौरा रद्द करणे.

4.इजिप्तमधील शर्म-अल-शेखची बैठक टाळणे.

5.ऑपरेशन सिंदूरबाबत ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याचे खंडन न करणे.

‘मध्यस्थी’ आणि ‘अभिनंदन’चा मुद्दा

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष थांबवून ‘गाझा शांतता करार’ केल्याचा दावा केला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत ट्रम्प यांचे अभिनंदन केले होते. तसेच, मोदींनी ट्रम्प यांना फोन करूनही शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0