Nalasopara Crime News : वालीव पोलिसांच्या हद्दीतून बेपत्ता झालेली तरुणी गुजरातमध्ये सापडली
•अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाची कारवाई ; 2019 अपहरण झालेल्या तरुणीला सुरत,गुजरात मधून पोलिसांनी घेतले ताब्यात
नालासोपारा :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी यशस्वी कारवाई करत 2019 मध्ये बेपत्ता झालेल्या रुबी दीनानाथ शर्मा या तरुणीला सुरतमधुन ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2019 मध्ये भादवी कलम 363,370 अंतर्गत रुबी ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कुटुंबाच्या तक्रारीवरून तिला कोणत्याही तरी आमिष दाखवून नेल्याचे सांगितले होते. मुलीच्या मोबाईल कॉल्स डिटेल वरून मुलीचा गुजरात राज्यातील सुरत येथे असल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालीव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता मुलीच्या शोधण्याकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांनी समांतर कारवाई करत मुलीच्या हरवल्यापासून ते आत्तापर्यंतचा कॉल डिटेल्स आणि तांत्रिक विश्लेषणाचा करून मुलगीही गुजरात राज्यातील सुरत येथील ऊन पाटिया, भेंडी बाजार रोड येथे असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. अनैतिक मानवी पथकाच्या पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी सहाय्यक फौजदार गवळी व दोन महिला अंमलदार यांचे एक पथक सुरत येथे रवाना केले होते. पोलिसांना मिळालेला तांत्रिक माहितीनुसार रुबी तिला तिच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चौकशी करिता ताब्यात घेतले असून तिचे अपहरण कोणी केले होते? कोणते आमिष दाखविले होते? या सर्वांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त श्री अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बल्लाळ यांचे आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा, नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी उत्कृष्ठरित्या केला आहे.सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणुक सायबर विभाग गुन्हे शाखा मि.भा.व.वि.यांनी मोबाईलवर तांत्रिक विश्लेषणाकरिता कामगिरी करत मुलीचा शोध घेण्यास महत्त्वाची भूमिका निभावली आहे.