Thackeray Group : शिवसेना ठाकरे गटाकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार

Thackeray Group On Neelam Gorhe : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करणार आहे
पुणे :- शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे Neelam Gorhe यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare या नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना दोन मर्सिडीज दिल्याशिवाय मोठे पद मिळत नाही असं खळबळ जनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला होता. त्यानंतर शिवसेना आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलेन करण्याच्या हेतूने नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक असे वक्तव्य केल्याचा आरोप करत सुषमा अंधारे यांनी आता त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.
नीलम गोऱ्ह यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केले. सत्ताधारी पक्षांना खुश करून राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असतील तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत. मात्र त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यांचे हे बेताल वक्तव्य वंदनीय बाळासाहेब यांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरचा घाव आहे, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचे रान करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोगली. मोबदल्यात एक नगरसेवकच काय साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलफेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी आहेत. पक्षाची प्रवक्ता आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोऱ्ह यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
नीलम गो-हे 25 वर्षांपासून पक्षात होत्या. त्यांच्या काळात असे काही झाले असेल, तर निश्चितच त्या त्याच्या लाभार्थी असतील. कलेक्शनचे काम एकनाथ शिंदेंकडे होते असेही काल त्या म्हणाल्या. त्यामुळे नेमके किती कलेक्शन झाले याबाबत दोघांनाही माहिती असेल. नीलम गो-हेंनी सांगितलेले कलेक्शन किती आहे, काय काय आहे, त्याची टिपणे जाहीर करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंची आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.