मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune news : झांबरे पॅलेस'च्या मालकाच्या सुनेची आत्महत्या

Pune news : पायलच्या सासरच्या लोकांकडून सोनं आणि पैशांसाठी त्यांचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

झांबरे पॅलेस'च्या मालकाच्या सुनेची आत्महत्या
झांबरे पॅलेस'च्या मालकाच्या सुनेची आत्महत्या

Pune news : कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू

Pune news : पायलच्या सासरच्या लोकांकडून सोनं आणि पैशांसाठी त्यांचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. पायल कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात आहे. या प्रकरणाची 'हत्या की आत्महत्या' या दोन्ही बाजूंनी सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी." - जनार्दन पवार, पायल यांचे चुलत भाऊhttps://maharashtramirror.com/ Pune news

Pune news :पुणे: पुण्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुकुंद नगर परिसरातील 'झांबरे पॅलेस' च्या मालकाच्या सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २९ वर्षीय सुशिक्षित तरुण सुनेने जुन्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. पायल पवार झांबरे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तीचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले होते. या घटनेमुळे मुकुंदनगर व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune news

मृत पायल ही खेडशिवापूर येथील प्रसिद्ध 'नक्षत्र पॅलेस'चे मालक पवार यांची मुलगी होती. माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल यांचे लग्न अत्यंत जंगी आणि थाटामाटात लावून देण्यात आले होते. या लग्नात झांबरे कुटुंबाने मोठा हुंडाही घेतला होता. लग्नानंतर काही महिन्यांपासून सासरच्या लोकांकडून तिला सातत्याने विविध कारणांवरून त्रास दिला जात होता.

काल (रविवारी) रात्री उशिरा सासू आणि पायल यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार खडाजंगी व वाद झाला होता. या भांडणानंतर रात्रीच्या किंवा आज पहाटेच्या सुमारास तणावाखाली असलेल्या पायलने झांबरे पॅलेस येथील एका जुन्या फ्लॅटमध्ये जाऊन गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोप-प्रत्यारोप करत परिसरात तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, सासरच्या संशयातीनी पलायन केल्याचे वृत्त आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सासरच्या मंडळींच्या जाचातून हा प्रकार घडला का, यादृष्टीने पोलीस आता कसून तपास करत असून, माहेरच्या लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी योग्य तो गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा