मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

बेकायदेशीर पिस्तूल, काडतुसे बाळगल्यामुळे तरुण अटकेत

५० हजार रुपये किमतीचे एक स्टीलचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

बेकायदेशीर पिस्तूल, काडतुसे बाळगल्यामुळे तरुण अटकेत

५० हजार रुपये किमतीचे एक स्टीलचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त

पुणे: दौंड शहरातील गजबजलेल्या शिवाजी महाराज चौकात बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक स्टीलचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, हे शस्त्र त्याने इंदापूर तालुक्यातील एका साथीदाराकडून विकत घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

वैभव संजय शिंदे (वय २९, रा. खडकी, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार देवीदास सुभाष राऊत यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव शिंदे आणि त्याला शस्त्र पुरवणारा अक्षय खोमणे (रा. चिखली, ता. इंदापूर) यांच्यावर भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २२) रात्री सव्वा दहाच्या सुमारास दौंड पोलिसांचे पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी दौंड-बारामती रोडवरील शिवाजी महाराज चौकात वैभव शिंदे हा संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक ९ एम.एम. चे स्टीलचे पिस्तूल सापडले. या पिस्तूलच्या काळ्या रंगाच्या मुठीवर दोन्ही बाजूंना लाल रंगाचे स्टारचे चिन्ह आहे. तसेच, त्याच्याकडे ३ हजार रुपये किमतीची ३ जिवंत काडतुसेही (राऊंड्स) मिळून आली.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत वैभवने हे पिस्तूल अक्षय खोमणे याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी ५३ हजार रुपयांचा हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीला अटक केली आहे. शस्त्र पुरवठा करणारा मुख्य आरोपी अक्षय खोमणे याचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे दौंड परिसरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस उपनिरीक्षक कदम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Youth arrested for possessing illegal pistol, cartridges

शेअर करा