सांगवीत पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त
1 मिनिट वाचन

५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त
पिंपरी: बेकायदेशीररीत्या पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवार (३ मे) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील बस स्टॉप जवळ करण्यात आली.

या प्रकरणात पोलीस हवालदार आशिष बनकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक अशोक भंडारी (२७, धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील बस स्टॉपजवळ एक तरुण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. अभिषेक याच्याकडे ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस विनापरवाना आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शस्त्र जप्त केले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.




