मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : सायबर फसवणुकीतील ४० हजार रुपये परत

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : सायबर फसवणुकीत गमावलेले ४० हजार रुपये येरवडा पोलिसांच्या सायबर पथकाने महिलेला परत मिळवून दिले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

सायबर फसवणुकीतील ४० हजार रुपये परत
सायबर फसवणुकीतील ४० हजार रुपये परत

Pune News :महिलेची ऑनलाईन फसवणूक प्रकरण; येरवडा पोलिसांच्या पाठपुराव्याला यश

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : सायबर फसवणुकीत गमावलेले ४० हजार रुपये येरवडा पोलिसांच्या सायबर पथकाने महिलेला परत मिळवून दिले. मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानंतर महिलेच्या मोबाईलमध्ये संशयास्पद ॲप इन्स्टॉल झाले आणि त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढण्यात आली. पोलिसांनी संबंधित बँक आणि मर्चंटशी संपर्क साधून सातत्याने पाठपुरावा केल्याने संपूर्ण रक्कम परत मिळाली.https://maharashtramirror.com/ Pune News

येरवडा परिसरातील रहिवासी महिलेने मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केले होते. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये ‘Jay VPN’ नावाचे संशयास्पद ॲप इन्स्टॉल झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेदरम्यान त्यांच्या बँक खात्यातून ४० हजार रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात सायबर अर्ज दाखल करण्यात आला.
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पथकाने तातडीने कार्यवाही केली. महिलेच्या मोबाईलची तपासणी करून संशयास्पद ॲप आणि मोबाईल सुरक्षेशी संबंधित बाबींवर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. तसेच फसवणुकीची रक्कम परत मिळवण्यासाठी संबंधित बँक आणि मर्चंटशी अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला. फोनद्वारे संपर्क साधून सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने संपूर्ण ४० हजार रुपये महिलेला परत मिळाले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमला रुजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शारदा कोकाटे आणि कश्यप दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गणेश रातीड, पोलीस अंमलदार समीर पिलाने, मनोज भागवत, स्वप्निल पिंगळे तसेच महिला पोलीस अंमलदार रोहिणी भोकसे आणि मीनाक्षी कापडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा