मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

स्वारगेट येथे पीएमपीएल बसमध्ये महिलेची सोन्याची बांगडी लंपास

१.८० लाखांचा ऐवज चोरीला; आळंदीला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने हातचलाखीने केली चोरी

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

स्वारगेट येथे पीएमपीएल बसमध्ये महिलेची सोन्याची बांगडी लंपास

१.८० लाखांचा ऐवज चोरीला; आळंदीला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने हातचलाखीने केली चोरी

पुणे: पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या स्वारगेट पीएमपीएल बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका ५४ वर्षीय महिलेची १ लाख ८० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरल्याची घटना घडली आहे. आळंदीला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने हातचलाखीने ही चोरी केली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भोर (जि. पुणे) परिसरात राहणाऱ्या एका ५४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ६) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास स्वारगेट येथील पीएमपीएल स्टँडवर घडली.

गर्दीचा साधला फायदा
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भोर येथून पुण्यात आल्या होत्या. स्वारगेट येथून त्यांना आळंदीला जायचे होते. दुपारी २:१५ च्या सुमारास आळंदीकडे जाणारी पीएमपीएल बस स्थानकावर आली. यावेळी बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होती. फिर्यादी महिला बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील १ लाख ८० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अतिशय शिताफीने चोरून नेली.

बसमध्ये बसल्यावर लक्षात आली चोरी
बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने फिर्यादींचे लक्ष आपल्या हाताकडे गेले असता, त्यांना हातातील सोन्याची बांगडी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने परिसरात शोध घेतला, मात्र गर्दीचा फायदा घेऊन चोरटा पसार झाला होता. अखेर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

प्रवाशांना खबरदारीचे आवाहन
स्वारगेट परिसरात बसमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांच्या दागिन्यांची किंवा मोबाईलची चोरी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवली असून, सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे चोरट्याचा माग काढला जात आहे.

सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा