मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

काळेवाडी येथे उघड्या पाईपमध्ये महिलेचा पाय अडकला

अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर झाली सुटका

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

काळेवाडी येथे उघड्या पाईपमध्ये महिलेचा पाय अडकला

अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर झाली सुटका

पिंपरी: काळेवाडी पाचपीर चौकाजवळ स्मिता भागवत कासारे (वय ६५) या महिलेचा पाय पाणीपुरवठा पाईप लाईनवरील व्हॉल्व्ह ऑपरेशनसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या काळेवाडी येथील अंदाजे २०० मिमी रुंदीच्या व ४ ते ५ फूट खोलीच्या पीव्हीसी पाईपमध्ये गुडघ्यापर्यंत अडकून पाय आतमध्ये अडकला. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दोन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवले.

अत्याधुनिक बचाव उपकरणांचा वापर
यासाठी पाईपच्या सभोवतालची जमीन खोदण्यात आली. बॅटरी ऑपरेटेड ग्राइंडर कटर, हायड्रॉलिक कटर, पेट्रोल इंजिन ऑपरेटेड कटर तसेच बॅटरी ऑपरेटेड पोर्टेबल कटर अशा अत्याधुनिक बचाव उपकरणांच्या साहाय्याने बचाव कार्य करण्यात आले.

महिला अग्निशामक जवानांनी सतत संवाद साधून दिला मानसिक आधार
महिलेचा पाय पाईपमध्ये घट्ट अडकल्यामुळे त्यांना कोणतीही हालचाल करता येत नव्हती. तसेच त्या बेशुद्ध पडू नयेत व बचाव कार्यात अधिक अडचण निर्माण होऊ नये याकरिता महिला अग्निशामक जवानांनी सतत संवाद साधून त्यांना मानसिक आधार दिला, पाणी पाजले व मोकळी हवा मिळेल याची काळजी घेत त्यांना सहकार्य करण्यासाठी धीर दिला.

दुय्यम धोका निर्माण होऊ नये म्हणून विशेष काळजी
खोदकामादरम्यान पाणीपुरवठा लाईन, विद्युत केबल्स किंवा पीएनजी गॅस पाईपलाईन यांना कोणतीही हानी पोहोचू नये तसेच अन्य कोणताही दुय्यम धोका निर्माण होऊ नये याबाबत विशेष काळजी घेण्यात आली. त्याचप्रमाणे अत्याधुनिक रेस्क्यू उपकरणांचा वापर करताना संबंधित महिलेच्या पायास कोणतीही इजा होणार नाही यासाठी अत्यंत दक्षतेने व सावधगिरीने बचाव मोहीम राबविण्यात आली.

शेअर करा