मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

आकुर्डी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

१७ हजार २०० रुपये किमतीचा ३४४ ग्रॅम गांजा जप्त

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

आकुर्डी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

१७ हजार २०० रुपये किमतीचा ३४४ ग्रॅम गांजा जप्त

पिंपरी: अंमली पदार्थ विरोधी पथकाने आकुर्डी येथे छापा टाकून बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या आकुर्डी येथील एका ५८ वर्षीय महिलेला अटक केली. ही कारवाई बुधवारी (२० मे) दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास खंडोबा माळ, आकुर्डी येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई मितेश यादव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्यम फॅब्रिकेशन शेजारील गल्लीत एक महिला अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता, संबंधित महिलेच्या ताब्यात १७ हजार २०० रुपये किमतीचा ३४४ ग्रॅम गांजा सापडला. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करत आहेत.

शेअर करा