Pune Water Crisis : बारा गावांचा पाणीप्रश्न सुटणार; निधीला मंजुरी
केंद्राकडून १ हजार २९० कोटी; पाणीपुरवठ्यासाठी ८९० कोटी, शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा व पूर नियंत्रणासाठी ४०० कोटींचा निधी
1 मिनिट वाचन

केंद्राकडून १ हजार २९० कोटी; पाणीपुरवठ्यासाठी ८९० कोटी, शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा व पूर नियंत्रणासाठी ४०० कोटींचा निधी
निलेश राऊत
पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेत समाविष्ट १२ गावांमधील पाणी पुरवठ्यासाठी ८९० कोटी आणि शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा व पूर नियंत्रणासाठी ४०० कोटींचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी एकूण १ हजार २९० कोटींच्या निधीला अर्बन चॅलेंज फंडअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता समाविष्ट १२ गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. पुराचे संकट निवारण्यासही मोठी मदत होणार आहे.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पहिल्या 'अॅपेक्स कमिटी'च्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर उपस्थित होत्या.
छायाचित्रे · 1/1
Arrow Keys ⟵ ⟶
२०० एमलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि ७१ किमी लांबीची जलवाहिनी
या निधीमुळे पुणे शहराच्या पायाभूत सुविधांना मोठी गती मिळणार आहे. पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीतील समान पाणीपुरवठा योजनेचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून, ऑगस्ट २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. त्याच धर्तीवर समाविष्ट १२ गावांसाठी ८९० कोटी रुपयांचा स्वतंत्र पाणीप…
जीबीएसचा वाढतोय धोका
१२ गावांमध्ये ग्युलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या जलजन्य आजाराने थैमान घातले होते. अनेक जण आजारी पडले, तर यात काही जणांचा प्राण गमवावा लागला होता. ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेली असली तरी त्यांना शुद्ध केलेले पाणी पुरविले जात नाही. त्यामुळे पुरवठा योजना राबविणे आवश्यक होते. त्यानुसार पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या गावांसाठी पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला होता.
शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि पूर नियंत्रण मिळविण्यासाठी ४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. शहरातील महत्त्वाच्या ३३५ पूरग्रस्त ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार आहे. त्यामध्ये नाला खोलीकरण आणि रुंदीकरण, कलव्हर्टसह विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या अतिरक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.
Water Crisis in Twelve Villages to be Resolved; Funds Approved




