मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : घरफोडीप्रकरणी पाच जणांना अटक; साडेसात लाखांचे सोने जप्त

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : गेल्या वर्षी दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करून साडेसात लाख रुपये किमतीचे ७४.८ ग्रॅम सोने जप्त केल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

घरफोडीप्रकरणी पाच जणांना अटक; साडेसात लाखांचे सोने जप्त
घरफोडीप्रकरणी पाच जणांना अटक; साडेसात लाखांचे सोने जप्त

Pune Crime :वानवडी पोलिसांची कारवाई

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : गेल्या वर्षी दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करून साडेसात लाख रुपये किमतीचे ७४.८ ग्रॅम सोने जप्त केल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली. या कारवाईत तक्रारदाराच्या मुलांची चोरीला गेलेली महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. धीरज ऊर्फ रंध्या रणधीर सावंत (वय २४, रा. अंजलीनगर, कात्रज) आणि विशाल संजय लोखंडे (वय २५, रा. अप्पर इंदिरानगर) यांच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३), ३०५ (अ), ३ (५) आणि ३१७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे राहते घर बंद असताना चोरट्याने छतावरून गॅलरीत उतरून घरात प्रवेश केला होता. घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मुलांची शैक्षणिक कागदपत्रे चोरून नेली होती. याप्रकरणी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि अल्फाज शेख यांनी सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. महिनाभराच्या तपासानंतर पाच जणांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सावंत याच्याकडून शैक्षणिक कागदपत्रे जप्त करण्यात आली. अन्य दोन आरोपींकडून चोरीला गेलेल्या सोन्यापैकी ७४.८ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, पोलीस निरीक्षक कैलास डाखोरे, तपास अधिकारी शशिकांत लोंढे आणि वानवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा