Pune Crime : वाहनाच्या धडकेत ट्रक चालक गंभीर
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवून खाली उतरलेल्या चालकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन पळ काढल्याची घटना वाकी फाटा येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ घडली.
1 मिनिट वाचन

Pune Crime : चाकण उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवून खाली उतरलेल्या चालकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन पळ काढल्याची घटना वाकी फाटा येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/
पारसनाथ हरगेन यादव (वय ४२, रा. खराबवाडी, खेड, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
फिर्यादी शुक्रवारी (दि. ४) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हे आपल्या ट्रकमध्ये युरिया भरण्यासाठी महामार्गाच्या कडेला ट्रक थांबवून खाली उतरले होते. त्याचवेळी नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना परिरसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. चाकण उत्तर पोलीस तपास करत आहेत.




