मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : वाकडमध्ये महिला, सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू; चिठ्ठीची चौकशी

पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : वाकडमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क या निवासी संकुलात ३३ वर्षीय महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या १८व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

वाकडमध्ये महिला, सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू; चिठ्ठीची चौकशी
वाकडमध्ये महिला, सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू; चिठ्ठीची चौकशी

Pune News : डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमधील घटना; १८व्या मजल्यावरून पडून माय-लेकाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू https://maharashtramirror.com/ Pune News

पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : वाकडमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क या निवासी संकुलात ३३ वर्षीय महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या १८व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांना महिलेच्या घरातून सात ते आठ पानी चिठ्ठी मिळाली असून, तिच्यातील मजकुराची तपासणी सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
मृत महिलेचे नाव एकता भांगड (वय ३३), तर मुलाचे नाव माधव भांगड (वय ६) असल्याचे वृत्त आहे. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे असून, गेल्या दोन वर्षांपासून सिग्नेचर पार्क संकुलात राहत होते. महिलेचे पती पुण्यातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत आहेत.

पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात महिला मुलासह लिफ्टने १८व्या मजल्यावर जाताना दिसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

चिठ्ठीतील मजकुराची पडताळणी
पोलिसांना महिलेच्या घरातून सात ते आठ पानी चिठ्ठी मिळाली आहे. वृत्तांनुसार, त्यात महिलेने आपल्या आजारपणाचा आणि मुलाच्या भविष्याबाबत वाटणाऱ्या चिंतेचा उल्लेख केला असल्याचे सांगितले जाते. चिठ्ठीतील मजकुराची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.

वाकड पोलिसांकडून तपास सुरू
घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी न्यायवैद्यक पथकानेही पाहणी केली. या घटनेमागील परिस्थिती आणि कारणांचा तपास वाकड पोलीस करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा