Pimpri news: वाकड ब्रीजजवळ ट्रकला कारची धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
Pimpri news : पिंपरी: हायवेवर धोकादायक रीतीने उभा केलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.
1 मिनिट वाचन

Pimpri news : महामार्गावर धोकादायकपणे उभा केला होता ट्रक
Pimpri news : पिंपरी: हायवेवर धोकादायक रीतीने उभा केलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी (२० सप्टेंबर) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई-सातारा हायवेवर वाकड ब्रीज येथील सूर्या अंडरपासजवळ घडली.https://maharashtramirror.com/ Pimpri News

पियुष संजय रसाळ (२१, रा. मुंढवा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुकेश सुनील साळुंके (२५, रा. मुंढवा) हा या अपघातात जखमी झाला आहे. या प्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक हसन बाबालाल मुलाणी (५८, रा, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pimpri News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र मुंबई मधील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन कारने परतत असताना, सूर्या अंडरपास जवळ वाकड येथे रस्त्यात दुभाजकाला लागून उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील बाजूचे टेल लॅम्प किंवा इंडिकेटर बंद होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही बॅरिकेड लावले नव्हते. कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात पीयुष रसाळ याचा ट्रकचा अँगल गळ्यात घुसून मृत्यू झाला, तर मुकेश सुनील साळुंके हा तरुण जखमी झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.




