मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठातर्फे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान

Pune News : पुणे : ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठातर्फे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान
डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठातर्फे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान

Pune News : पुणे : ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या वतीने ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विद्यापीठाच्या कुलपती आबेदा इनामदार आणि कुलगुरू डॉ. सुनील कुमार यांच्या उपस्थितीत प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News

प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढ, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या या यशामुळे ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला विशेष मान्यता मिळाली आहे. या सन्मानाबद्दल ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सन्माननीय सागर ढोले पाटील यांनी प्राचार्य विठ्ठल गायकवाड यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा