Pune Crime : उरुळी कांचन येथे ३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक
Pune Crime : पुणे: जुनी कार विकण्याचे आमिष दाखवून आणि डेंटिंग-पेंटिंगचे काम करून देण्याचा बहाणा करत एका व्यक्तीची तब्बल ३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
1 मिनिट वाचन

Pune Crime : जुनी कार विक्रीचा केला बहाणा
Pune Crime : पुणे: जुनी कार विकण्याचे आमिष दाखवून आणि डेंटिंग-पेंटिंगचे काम करून देण्याचा बहाणा करत एका व्यक्तीची तब्बल ३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश रामदास गोठे (वय ३५, रा. ता. दौंड) यांनी सोरतापवाडी (ता. हवेली) येथील 'निळकंठ मोटर्स' जवळून एक वॅगन आर गाडी (क्रमांक एमएच १४ जीएस ६९४०) खरेदी केली होती. या वाहनासाठी त्यांनी आरोपी आकाश मारुती चौधरी (रा. पेठ, ता. हवेली) याला ३ लाख १० हजार रुपये दिले होते. ही व्यवहार प्रक्रिया ०७ मे २०२६ ते १७ जुलै २०२६ या कालावधीत पार पडली. https://maharashtramirror.com/ Pune Crime
पैसे घेतल्यानंतर आरोपीने गाडीचे डेंटिंग आणि पेंटिंगचे काम करून देतो, असे आश्वासन फिर्यादीला दिले होते. मात्र, बरेच दिवस उलटूनही आरोपीने गाडीचे काम करून दिले नाही आणि वाहनाचा ताबाही फिर्यादीच्या हवाली केला नाही. स्वतःचे पैसे देऊनही गाडी न मिळाल्याने व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगेश गोठे यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार चितारे करत आहेत.




