मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कात्रज येथे दारु पिण्यास पैसे न दिल्याने मावस भावावर चाकूने गळ्यावर वार

संशयित आणि फिर्यादी दोघेही साठी ओलांडलेले आहेत

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

कात्रज येथे दारु पिण्यास पैसे न दिल्याने मावस भावावर चाकूने गळ्यावर वार

संशयित आणि फिर्यादी दोघेही साठी ओलांडलेले आहेत

निलेश राऊत
पुणे: त्या दोघांनीही ६० ओलांडलेली, ते मावशीबरोबर एकत्र राहतात. काही काम धंदा न करणार्‍या ६५ वर्षाच्या मावस भावाने ६७ वर्षाच्या कामाला जाणार्‍या भावाला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने रागाच्या भरात मावस भावाने चाकूने गळ्यावर हातावर वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत माधव दत्तात्रय भोपे (वय ६७, रा. कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शरण श्रीपाद हेगडे (वय ६५) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महावीर कुंज सोसायटीत त्यांच्या राहत्या घरी १८ मे रोजी रात्री ८ वाजता घडली.

कौटुंबिक पार्श्वभूमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधव भोपे हे अविवाहित असून त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. त्यांची मावशी निशा हेगडे (वय ८५) हिने त्यांचा लहानपणापासून सांभाळ केला आहे. ते तिघे एकत्र राहतात. त्यांचा मावस भाऊ शरण काही कामधंदा करत नाही. तसेच त्याला दारुचे व्यसन आहे. माधव भोपे हे आर्किटेक्चर असून एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला आहेत.

असा घडला प्रसंग
१८ मे रोजी रात्री ते कामावरुन घरी परत आले. तेव्हा शरण हेगडे याने त्यांना दारु पिण्यासाठी पैसे मागू लागला. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तो रागाने किचनमध्ये गेला. तेथून भाजीपाला कापण्याचा चाकू घेऊन आला. त्यांना काही समजायच्या आत त्याने माधव भोपे यांच्या गळ्यावर डाव्या बाजूला, उजव्या हाताच्या बोटावर वार केला. त्यांना शिवीगाळ करु लागला.

त्यांच्या गळ्यातून रक्त येऊ लागल्याचे पाहून सोसायटीतील शिवाजी वाल्हेकर व इतरांना आवाज देऊन बोलावून घेतले. सोसायटीतील लोक आल्याचे पाहून शरण हेगडे पळून गेला. वाल्हेकर यांनी रिक्षातून त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांच्या जखमेवर टाके टाकले़ उपचार घेतल्यानंतर त्यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे क्राईम न्यूज

शेअर करा