मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ujjain News : उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या कारवाईवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

Ujjain News :उज्जैन : शहरातील अब्दालपुरा परिसरात शाही मशिदीचा रस्ता रुंदीकरणाच्या कामात येणारा काही भाग हटवण्याच्या कारवाईवरून वातावरण चांगलेच तापले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या कारवाईवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर
उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या कारवाईवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

Ujjain News :उज्जैन : शहरातील अब्दालपुरा परिसरात शाही मशिदीचा रस्ता रुंदीकरणाच्या कामात येणारा काही भाग हटवण्याच्या कारवाईवरून वातावरण चांगलेच तापले आहे. सिंहस्थ २०२८च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी प्रशासनाकडून मशिदीचा प्रभावित भाग हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईला विरोध करण्यासाठी रविवारी रात्रीपासून स्थानिक नागरिक आणि मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने मशिदीजवळ जमा झाले होते.https://maharashtramirror.com/ Ujjain News
दरम्यान, या प्रकरणावरून मुस्लिम समाजातही दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले. एका गटाने प्रशासनाशी चर्चा करून रस्ता रुंदीकरणात येणारा भाग स्वतःहून हटवण्याची तयारी दर्शवली, तर दुसऱ्या गटाने कारवाईला विरोध करत आंदोलन सुरू ठेवले. प्रशासन आणि समाजाच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेनंतर प्रभावित भाग स्वतःहून हटवण्याबाबत सहमती झाल्याचे वृत्त आहे.https://maharashtramirror.com/ Ujjain News
गेल्या दोन दिवसांपासून शाही मशीद हटवली जाणार असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. त्यामुळे रविवारी रात्री मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. त्याचवेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह जेसीबी आणि पोकलेन मशीन घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. आंदोलकांनी प्रशासन आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.
सोमवारी सकाळी मशिदीचा प्रभावित भाग हटवण्याची प्रक्रिया सुरू होताच पुन्हा मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली. यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
सिंहस्थ २०२८च्या तयारीसाठी उज्जैनमध्ये विविध मार्गांचे रुंदीकरण आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. त्याच कामाचा एक भाग म्हणून शाही मशिदीच्या प्रभावित भागावर कारवाई करण्यात येत असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये पुढील घडामोडी काय होतात, याकडे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा