मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Tipu Sultan : "सपकाळांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस!"; भाजप जिल्हाध्यक्षांची प्रक्षोभक घोषणा; पुण्यात दगडफेक अन् राडा

• BJP On Tipu Sultan : टिपू सुलतानशी केलेल्या तुलनेवरून भाजप आक्रमक; जुन्या बसस्थानक चौकात जोरदार निदर्शने; काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट

V
Vivek

1 मिनिट वाचन

Tipu Sultan : "सपकाळांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस!"; भाजप जिल्हाध्यक्षांची प्रक्षोभक घोषणा; पुण्यात दगडफेक अन् राडा

•BJP On Tipu Sultan : टिपू सुलतानशी केलेल्या तुलनेवरून भाजप आक्रमक; जुन्या बसस्थानक चौकात जोरदार निदर्शने; काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी Tipu Sultan केल्याच्या निषेधार्थ भाजपने राज्यभर आंदोलने छेडली आहेत. या आंदोलनादरम्यान भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी अत्यंत प्रक्षोभक विधान करत, हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या विधानामुळे वातावरण अधिकच तापले असून कायद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं?

शहरातील जुन्या बसस्थानक चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अनिल मोहिते म्हणाले,"छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी सपकाळ यांनी क्रूर टिपू सुलतानची बरोबरी महाराजांशी केली आहे. हा शिवरायांचा अवमान आहे. अशा व्यक्तीची जीभ छाटणाऱ्यास भाजपच्या वतीने 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल."

पुण्यातील काँग्रेस भवनसमोर राडा

दुसरीकडे, पुण्यातही या वादाचे हिंसक पडसाद उमटले आहेत. शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनसमोर पतित पावन संघटना आणि भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी आंदोलन केले. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने दोन्ही गटात मोठी झटापट झाली.

दगडफेक: आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूंनी दगड भिरकावण्यात आले, ज्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

पोलीस बंदोबस्त: वाढता तणाव पाहता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सध्या काँग्रेस भवन परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

तुलनेवरून संतापाची लाट

भाजप नेत्यांच्या मते, टिपू सुलतानने हजारो हिंदूंचे धर्मांतर केले आणि हत्या केल्या, अशा व्यक्तीची तुलना रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या महाराजांशी करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. मात्र, अनिल मोहिते यांनी दिलेल्या 'बक्षीस' घोषणेमुळे आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा