रु. ३५,००० किंमतीची तांब्याची वायर चोरणारे येरवडा येथे जेरबंद
तपास पथकाने अज्ञात आरोपीताबाबत कोणतीही माहिती नसताना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व इतर ठिकाणाच्या ५० सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयित निष्पन्न करून ताडीगुत्ता, येरवडा या ठिकाणी सापळा रचुन, त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले
2 मिनिट वाचन

भारत डायग्नोस्टिक सेंटर, राजीव गांधी हॉस्पीटल, येरवडा, येथील एमआरआय मशिनची वायर कापुन चोरी केल्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला होता
तपास पथकाने अज्ञात आरोपीताबाबत कोणतीही माहिती नसताना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व इतर ठिकाणाच्या ५० सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयित निष्पन्न करून ताडीगुत्ता, येरवडा या ठिकाणी सापळा रचुन, त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले

पुणे, एप्रिल ९, महाराष्ट्र मिरर: काही दिवसांपूर्वी येरवडा येथील एका हॉस्पिटलमधून तांब्याची वायर चोरीला गेल्याची घटना घडली. त्यातील चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि चोरी गेलेली वायर हस्तगत केली आहे.
भारत डायग्नोस्टिक सेंटर, राजीव गांधी हॉस्पीटल, येरवडा, येथील एमआरआय मशिनची हिरव्या रंगाची कॉपर वायर कापुन चोरी केल्याबाबत गुन्हा ६ एप्रिल रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री रविंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे तपास पथकाने अज्ञात आरोपीताबाबत कोणतीही माहिती नसताना पोलीस अंमलदार भिमराव कांबळे व सुरज ओंबासे यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व इतर ठिकाणाच्या ५० सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयित निष्पन्न करून ताडीगुत्ता, येरवडा या ठिकाणी सापळा रचुन त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.
संशियितांची नांवे पुढीलप्रमाणे आहेत: दिनेश भगवान साळवे (वय २२ वर्षे, रा. यशवंतनगर, येरवडा), बद्रुजमान जिहाउल शेख (वय २४ वर्षे, रा. ताडीगुत्ता, येरवडा), अब्राहिम नरेश यादव (वय २० वर्षे, रा. ताडीगुत्ता, येरवडा) आणि सचिन सुरेश गवळी ऊर्फ गोलडया (वय ३६ वर्षे, रा. ताडीगुत्ता, येरवडा). त्यांच्याकडील ३५,००० रुपये किमतीची एकुण ३० मीटर लांबीची हिरव्या रंगाची प्लास्टिक आवरण असलेली कॉपर वायर हस्तगत करण्यात आली आहे.
सदर कामगिरी अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परीमंडळ ४. चिलुमुला रजनिकांत, सहा पोलिस आयुक्त, येरवडा विभाग सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन रविंद्र कदम, सहा पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस उपनिरीक्षक संदिप जगताप, पोलीस अंमलदार शिंदे, कांबळे, ओंबासे, गायकवाड, शेख, परदेशी, जाधव व शिंदे यांनी केली आहे.
हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याने मॅनेजरला मारहाण
खराळवाडी येथील एका हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याचा राग धरून एका ग्राहकाने हॉटेलच्या मॅनेजरला गाडीच्या चावीने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (६ एप्रिल) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उडपी लंच होम, खराळवाडी येथे घडली.
या प्रकरणी हॉटेल मॅनेजर राघवेंद्र सीताराम शेट्टी (४५, खराळवाडी, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संकेत सकपाळ (२७, खराळवाडी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत सकपाळ याने सुरुवातीला हॉटेलमधील वेटरला शिवीगाळ केली. त्यानंतर मॅनेजर शेट्टी यांनी त्याला जेवणाचे बिल मागितले असता, आरोपीने रागाच्या भरात आपल्या जवळील अॅक्टिव्हा गाडीची चावी शेट्टी यांच्या मानेवर आणि डोक्यावर मारली. यामध्ये शेट्टी जखमी झाले आहेत. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
Thief of copper wire worth Rs. 35,000 arrested in Yerwada




