Pune News : थेऊरजवळ कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; दोघे जखमी
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : कोलवडी-थेऊर रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या एका कारने दुसऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
1 मिनिट वाचन

Pune News : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : कोलवडी-थेऊर रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या एका कारने दुसऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
सिमरोट नायक (वय ४४, रा. लोधा क्राऊन प्रोजेक्ट, तळोजा एमआयडीसी रोड, डोंबिवली पूर्व, कल्याण, जि. ठाणे) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नाशिक येथील एका ३४ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
फिर्यादी हे त्यांची मैत्रीण सिमरोट नायक आणि तिच्या मुलीसह शनिवारी (दि.४) रोजी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास कारने प्रवास करत होते. हवेली तालुक्यातील थेऊर गावाच्या हद्दीतील कोलवडी-थेऊर पूल ओलांडून थेऊर स्मशानभूमीजवळ आले असता समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील सिमरोट नायक यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील फिर्यादी आणि मृत महिलेची मुलगीही अपघातात जखमी झाली आहे. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. धडक दिल्यानंतर आरोपी चालकाने कारसह तेथून पळ काढला. पोलीस उपनिरीक्षक पैंठणे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.




