मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मौजमजेसाठी मोटार सायकलींची चोरी

अल्पवयीन सराईताकडून १० वाहने हस्तगत, ८ गुन्हे उघडकीस

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

मौजमजेसाठी मोटार सायकलींची चोरी

अल्पवयीन सराईताकडून १० वाहने हस्तगत, ८ गुन्हे उघडकीस

पुणे: वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे हे तपास पथकातील पोलीस अंमलदारांसह वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधाचे अनुशंगाने गस्त घालत असताना बारटक्के हॉस्पिटल जवळ एका काळ्या सिल्वर रंगाच्या स्प्लेंडर प्लस दुचाकीसह एक संशयीत मुलगा थांबलेला दिसल्याने पोउपनि संजय नरळे यांनी त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यास विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी ही वारजे येथील बोरीकर हॉस्पिटल येथून चोरी केल्याचे कबूल केले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने आणखी दुचाकी वाहने चोरल्याची कबूली दिली. त्याच्याकडून एकुण १० दुचाकी मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील ४, अलंकार, पिंपरी-चिंचवड, खराडी पोलीस ठाणे व लोणीकंद पोलीस ठाणे येथील प्रत्येकी १ असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर वाहने ही त्याने मौजमजेसाठी चोरली असल्याचे सांगितले असुन सदर विधीसंघर्षीत बालकाकडून खालील वाहने जप्त करण्यात आले आहेत.

हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी (एम एच ५० आर ७४०७), युनिकॉर्न दुचाकी (एम एच ०४ डी पी २२७२), हिरो पॅशन प्रो दुचाकी (एम एच १२ एल एन ३५६९), होन्डा शाईन दुचाकी (एम एच १२ पि जे ८८५२), होंडा सी बी शाईन दुचाकी (एच एम १२ एस बी ६९९९), अॅक्टिवा मोपेडे (एम एच १२ एस डब्लू २९३७), प्लेजर मोपेड (एम एच १२ जे डी ०२८९), हिरो स्प्लेंडर दुचाकी (एम एच १२ आर एच १०४७), होंडा अॅक्टिवा मोपेड (एम एच १२ यु बी ९१४५), हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी (एम एच १२ जी एच १५१४).

सदरची कारवाई ही अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, राजेश बनसोडे, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर, सुजाता तानवडे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, यांचे सुचनेनुसार व महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रकाश धेंड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, योगेश वाघ, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, सागर कुंभार, अमोल सुतकर यांनी केलेली आहे.

शेअर करा