मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पुणे कॅम्पमधील वृद्धाश्रमात चोरी

८० वर्षीय महिलेचे ७० हजारांचे दागिने कपाटातून लंपास

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

पुणे कॅम्पमधील वृद्धाश्रमात चोरी

८० वर्षीय महिलेचे ७० हजारांचे दागिने कपाटातून लंपास

पुणे: पुण्यातील लष्कर (कॅम्प) परिसरातील एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या ८० वर्षीय ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या दोन सोन्याच्या चेन आणि पेंडन्ट असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा ऐवजी अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कॅम्प येथील नेपिअर रोडवरील एका वृद्धाश्रमात (रिटायरमेंट होम) राहणाऱ्या ८० वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही चोरी १२ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नेपिअर रोडवरील जुन्या चर्चजवळील 'रिटायरमेंट होम’मध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी आपले सोन्याचे दागिने सुरक्षित राहतील या उद्देशाने खोलीतील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले होते. यामध्ये दोन सोन्याच्या चैन आणि एका पेंडलचा समावेश होता. गेल्या काही दिवसांत चोरट्याने या लॉकरचा कसाबसा प्रवेश मिळवून त्यातील ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही चोरी नेमकी कधी झाली, याबाबत निश्चित वेळ समजू शकलेली नाही; मात्र १२ ते २२ एप्रिल या १० दिवसांच्या कालावधीत ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'रिटायरमेंट होम’मध्ये ही चोरी झाल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लष्कर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती घेत आहेत. पोलीस अंमलदार कुंभार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा