मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Supriya Sule : "ठाकरे नाव अडगळीला जाणारं नाही, ते महाराष्ट्राचं अभिमान आहे" – सुप्रिया सुळे यांचा ठाम विश्वास

•राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांचे स्वागतच आहे ; खासदार सुप्रिया सुळे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Supriya Sule

•राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांचे स्वागतच आहे ; खासदार सुप्रिया सुळे

हिंजवडी, पुणे | “ठाकरे ब्रँडला कोणीही संपवू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे केवळ नेता नव्हते, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक होते,” असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले.

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी मनापासून स्वागत करत "ठाकरे हे फक्त आडनाव नसून, प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजाचं नाव आहे" असं भावनिक वक्तव्य केलं.

त्याचवेळी, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढत स्पष्ट आरोप केला की, “ही परिस्थिती सरकारच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झाली आहे.” हिंजवडीमधील रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी सरकारला 26 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला. "वेळेत सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडू; आणि सुधारणा झाली तर संबंधित अधिकाऱ्यांचा मी स्वतः सत्कार करीन", असा दम भरत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समावेश करावा की नाही, या प्रश्नावर सुळे यांनी 'जनतेचं मत महत्त्वाचं' असल्याचं नमूद करत विकासाला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं.

हेही वाचा: Nallasopara Cyber Fraud Awareness : सायबर गुन्हेगारीवर 'पोलीस शिकवणी'!

शेअर करा