मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thackeray Prachar List : शिवसेनेचा प्रचारासाठी 'मास्टरप्लॅन'! 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; आज विक्रोळीत रंगणार उद्धव-राज ठाकरेंची पहिली संयुक्त सभा

Shivsena UBT Latest News : ठाकरे बंधूंच्या 7-8 सभांचे नियोजन; आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची जोडगोळीही मैदानात उतरणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray,Shiv Sena,Mahavikas Aghadi,Maharashtra Bandh,उद्धव ठाकरे,शिवसेना,महाविकास आघाडी,महाराष्ट्र बंद

Shivsena UBT Latest News : ठाकरे बंधूंच्या 7-8 सभांचे नियोजन; आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची जोडगोळीही मैदानात उतरणार

मुंबई | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होत असून, प्रचाराचा धुराळा उडवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपल्या 40 स्टार प्रचारकांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अनुभवी नेत्यांपासून ते आक्रमक वक्त्यांपर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, 'ठाकरे ब्रँड'ची ताकद दाखवण्यासाठी आज पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली महासभा होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.

शिवसेनेचे 40 'दबंग' प्रचारक

ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खालील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे:

उद्धव ठाकरे
आदित्य ठाकरे
सुभाष देसाई
संजय राऊत
अनंत गीते
चंद्रकांत खैरे
अरविंद सावंत
भास्कर जाधव
अनिल देसाई
विनायक राऊत
अनिल परब
राजन विचारे
सुनील प्रभू
आदेश बांदेकर
वरुण सरदेसाई
अंबादास दानवे
रवींद्र मिरलेकर
नितीन पाटील
राजकुमार बाफना
प्रियांका चतुर्वेदी
सचिन अहिर
लक्ष्मण वाढले
मनोज जामसुतकर
नितीन देशमुख
सुषमा अंधारे
संजय जाधव
ज्योती ठाकरे
जयश्री शेळके
जान्ह्वी सावंत
शरद कोळी
ओमराजे निंबाळकर
सुनील शिंदे
हारुन खान
सिद्धार्थ खरात
वैभव नाईक
आनंद दुबे
अशोक तिवारी
राम साळगावकर
प्रियांका जोशी
अनिश गाढवे

विक्रोळीत आज 'ठाकरे' गर्जना!

मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र येत आहेत. विक्रोळीतील ही पहिली सभा असून, यानंतर मुंबईत दोन्ही नेत्यांच्या आणखी 7 ते 8 संयुक्त सभांचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ सभाच नव्हे, तर दोन्ही नेते एकत्रितपणे शिवसेना आणि मनसेच्या शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणार आहेत.

आदित्य-अमित ठाकरेंचीही जुगलबंदी
वडिलांप्रमाणेच पुढच्या पिढीतील नेते म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याही मुंबईत दोन संयुक्त सभा होणार आहेत. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि युतीची ताकद दाखवण्यासाठी हा विशेष प्रयोग केला जात आहे.

शेअर करा