मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पतीच्या आजारपणाचा फायदा घेऊन मालमत्ता बळकावली

Pune News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : तीच्या आजारपणाचा आणि असमर्थ शारीरिक स्थितीचा फायदा घेऊन कोट्यवधींची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

3 मिनिट वाचन

पतीच्या आजारपणाचा फायदा घेऊन मालमत्ता बळकावली पोलीस महिला कर्मचाऱ्याची फसवणूक
पतीच्या आजारपणाचा फायदा घेऊन मालमत्ता बळकावली पोलीस महिला कर्मचाऱ्याची फसवणूक

Pune News : पोलीस महिला कर्मचाऱ्याची फसवणूक

Pune News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : तीच्या आजारपणाचा आणि असमर्थ शारीरिक स्थितीचा फायदा घेऊन कोट्यवधींची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १७ एप्रिल रोजी सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल येथे घडली.https://maharashtramirror.com/ Pune News

या प्रकरणी एका ४० वर्षीय महिला पोलीस हवालदाराने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन बाबूराव दळवी (५५, लोणावळा), संकेत जयवंत खानेकर (३०, जांभूळ), संतोष शंकर गडपाळे (५२, खोपोली) आणि एका ४५ वर्षीय महिलेच्या (कोथुर्णे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

फिर्यादीचे दीर आरोपी नितीन दळवी याने इतर आरोपींच्या मदतीने फिर्यादीच्या पतीला पवना हॉस्पिटलमधून बळजबरीने डिस्चार्ज करून घेतले. त्यानंतर त्यांच्या मालकीची कोथुर्णे येथील जमीन स्वतःच्या नावे करणारे बक्षीसपत्र तयार करून घेतले. हे बक्षीसपत्र फिर्यादीच्या पतीने स्वेच्छेने केलेले नसून त्यांच्यावर दबाव आणून व भीती दाखवून करण्यात आले. या मालमत्तेचे वारसदार असतानाही फिर्यादी किंवा त्यांच्या मुलीची परवानगी न घेता आरोपींनी फसवणूक करून मालमत्ता स्वतःच्या नावावर केली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.


बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग प्रकरणी एकास अटक

चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : व्यावसायिक वापराच्या गॅस टाकीतून लहान गॅस टाकीत विनापरवाना आणि धोकादायक पद्धतीने गॅस भरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी बिरदवडी येथील आकाश पवार यांच्या भाड्याच्या खोलीत करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळ मराडे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रवी किसन माडेकर (आंबेठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व्यावसायिक वापराच्या गॅस टाकीमधून लाल रंगाच्या लहान टाकीमध्ये नोझल पाईपच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे गॅस भरत असताना आढळून आले. आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे घरगुती वापराचा ज्वालाग्राही गॅस लहान टाकीत भरून शासन व ग्राहकांची फसवणूक करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून १०,५०० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस तपास करीत आहेत.


साडी खरेदीचे आमिष दाखवून तरुणीची १.१९ लाखांची फसवणूक

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : इन्स्टाग्रामवर साडीची जाहिरात पाहून खरेदीसाठी संपर्क साधलेल्या तरुणीची ऑनलाइन १ लाख १९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी माण-हिंजवडी येथील सीएमआर पीजी येथे घडली.

या प्रकरणात एका २७ वर्षीय तरुणीने (माण, हिंजवडी, मूळ - अमणापूर, सांगली) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इन्स्टाग्राम आयडी धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरुणी इन्स्टाग्रामवर रील्स पाहत असताना त्यांना 'मनिष मॅन्युफॅक्चर' नावाच्या कपड्यांच्या दुकानाची साडी आवडली. त्यांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधला असता, आरोपीने पैसे पाठवल्यानंतर जीएसटी भरण्याच्या बहाण्याने आणि विविध कारणांनी टप्प्याटप्प्याने पैसे मागून घेतले. साडी न पाठवता आरोपीने तरुणीची एकूण १ लाख १९ हजार २०९ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


क्रिप्टो करन्सीत दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून ८ लाखांची फसवणूक

तरुणींसह दोघांची फसवणूक .

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट मिळतील असे आमिष दाखवून एका तरुणीसह तिच्या ओळखीच्या दोघांची तब्बल ८ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना एप्रिल २०२६ मध्ये भूमकर चौक, वाकड येथे घडली.

या प्रकरणी एका २३ वर्षीय तरुणीने (वाकड, पुणे) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील राठोड (३७) आणि एका ३२ वर्षीय महिलेच्या (दोघे रा. दत्तवाडी, नेरे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी फिर्यादी तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्याकडून २ लाख ७३ हजार ४८२ रुपये तसेच तिच्या ओळखीच्या भागवत घोडके व अभिषेक घोडके यांच्याकडून ५ लाख ४२ हजार ४२४ रुपये असे एकूण ८ लाख १५ हजार ९०६ रुपये वैयक्तिक अकाउंटवर व स्कॅनरद्वारे ऑनलाइन घेतले. पैसे घेतल्यानंतर कोणताही परतावा न देता आरोपींनी त्यांची आर्थिक फसवणूक केली. हिंजवडी पोलीस या गुन्ह्याचा चा पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा