तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
दिनेश माने याला ११ नोव्हेंबर २०२४ पासून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.
1 मिनिट वाचन

दिनेश माने याला ११ नोव्हेंबर २०२४ पासून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.
पिंपरी: पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाला कोयत्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या मैदानात सोमवारी (२५ मे) रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

दिनेश गोरख माने (३१, नेहरुनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल भागवत गायकवाड यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश माने याला ११ नोव्हेंबर २०२४ पासून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याने कोणतीही परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. सध्या शहरात घातक शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही आरोपीकडे लोखंडी कोयता आढळला. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.




