मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : एस.टी. बसने करा स्वस्त आणि दर्जेदार तीर्थाटन; स्वारगेट आगाराची आकर्षक ‘एस.टी. संगे तीर्थाटन योजना’ जाहीर!

Pune News :पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) स्वारगेट आगारामार्फत प्रवाशांसाठी एक अत्यंत आकर्षक अशी ‘एस.टी.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

एस.टी. बसने करा स्वस्त आणि दर्जेदार तीर्थाटन; स्वारगेट आगाराची आकर्षक ‘एस.टी. संगे तीर्थाटन योजना’ जाहीर!
एस.टी. बसने करा स्वस्त आणि दर्जेदार तीर्थाटन; स्वारगेट आगाराची आकर्षक ‘एस.टी. संगे तीर्थाटन योजना’ जाहीर!

Pune News :पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) स्वारगेट आगारामार्फत प्रवाशांसाठी एक अत्यंत आकर्षक अशी ‘एस.टी. संगे तीर्थाटन योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील तसेच देशातील विविध प्रसिद्ध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या देवदर्शन सहलींचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वारगेट आगाराचे आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी केले आहे. या विशेष योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या सहलींमध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात (५०% सवलत) प्रवास करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच, ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नोव्हेंबर २०२६ मध्ये विविध धार्मिक स्थळांच्या सहलींचे नियोजन करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/Pune News


प्रमुख सहलींचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:निळकंठ धाम दर्शन (गरुडेश्वर, सरदार वल्लभभाई पटेल स्मारक, निलकंठ धाम): १२.११.२०२६ व १६.११.२०२६ रोजी (०४ रात्र ०५ दिवस). बाळूमामा आदमापूर दर्शन (कोल्हापूर महालक्ष्मी, नरसोबाची वाडी, खिद्रापूरसह): १३ आणि १४.११.२०२६ तसेच १७ ते १८.११.२०२६ रोजी (०१ रात्र ०२ दिवस). कोकण दर्शन (दिवेआगर, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा किल्ला): १३ ते १४, १४ ते १५ आणि १५ ते १६ नोव्हेंबर २०२६ रोजी (०१ रात्र ०२ दिवस). महाकाल दर्शन (उज्जैन, ओमकारेश्वर, इंदूरसह): १६.११.२०२६ ते २१.११.२०२६ दरम्यान (०४ रात्र ०५ दिवस). बदामी हंपी दर्शन: १९ ते २२ नोव्हेंबर आणि २७ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान (०३ रात्र ०४ दिवस). पाच ज्योतिर्लिंग दर्शन (औंढा नागनाथ, परळी वैजिनाथ, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर): १९.११.२०२६ ते २२.११.२०२६ दरम्यान (०४ रात्र ०५ दिवस). साडेतीन शक्तीपीठ दर्शन (तुळजापूर, कोल्हापूर, माहूर, सप्तशृंगी देवी वणी): २३.११.२०२६ ते २७.११.२०२६ दरम्यान (०४ रात्र ०५ दिवस). शेगाव दर्शन (शेगाव, माहूर, लोणार सरोवर): २७.११.२०२६ व ०१.१२.२०२६ रोजी (०४ रात्र ०५ दिवस). अष्टविनायक दर्शन (शिवनेरी बसने): २८.११.२०२६ ते २९.११.२०२६ दरम्यान (०१ रात्र ०२ दिवस). या सहलींबद्दल अधिक माहिती आणि बुकिंगसाठी प्रवासी राजू सरकाळे (मोबाईल: ९९२३५६२५२४) किंवा संतोष सपकाळ (मोबाईल: ८१४९०२८००१) यांच्याशी संपर्क साधू शकतात. नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा