मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bank Fraud Pune : पुण्यात बँकेची 11 कोटींची फसवणूक; खोट्या ‘एनओसी’चा वापर

सुवर्णयुग सहकारी बँकेला चुना : चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bank Fraud Pune : पुण्यात बँकेची 11 कोटींची फसवणूक; खोट्या ‘एनओसी’चा वापर

सुवर्णयुग सहकारी बँकेला चुना : चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे :- बनावट नाहरकत दाखला बॅंकेत सादर करुन तब्बल ११ कोटींचा फसवणूकीचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील एका खासगी बँकेचे बनावट 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) वापरून बँकेची तब्बल 11 कोटी 47 लाख 83 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 30 जानेवारी 2018 ते 10 एप्रिल 2023 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्यादी कौशिक सुरेश पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, मे. रोहित सर्व्हिस स्टेशन, माणिक बिहाणी (वय 64), सतीश भुतडा (वय 62) आणि रोहित बिहाणी (वय 42) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फर्ग्युसन रस्त्यावरील एचडीएफसी बँकेचे HDFC Bank बनावट 'एनओसी' नाहरकत तयार केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सुवर्णयुग सहकारी बँकेकडून Suvarnayug Cooperative Bank पाच कोटींहून अधिक रकमेचे कर्ज मिळवले. कर्ज मिळाल्यानंतर आरोपींनी त्याची परतफेड केली नाही. 11 कोटी 47 लाख 83 हजार 688 रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. या घटनेमुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे होणाऱ्या फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News : मुंबईत 10 कोटींचे ड्रग्ज जप्त; 'एमडी' तस्करांची साखळी उद्ध्वस्त, पाच जण जेरबंद

शेअर करा