मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Suresh Dhas : आमदारपुत्राच्या भरधाव कारची धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू!

Beed Accident News : सुपा परिसरात रात्री उशिरा भीषण अपघात; नितीन शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Suresh Dhas : आमदारपुत्राच्या भरधाव कारची धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू!

Beed Accident News : सुपा परिसरात रात्री उशिरा भीषण अपघात; नितीन शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू

पुणे | सत्ताधारी आमदाराचा मुलगा, भरधाव कार, आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू… ही सगळी घटना एका क्षणात घडली. सोमवारी (7 जुलै) रात्री 10.30 च्या सुमारास, बीड जिल्ह्यातील सुपा पोलीस ठाण्याच्या Supa Police Station हद्दीत भीषण अपघात झाला. आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत नितीन शेळके (वय अंदाजे 30) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही धडक एवढी प्रचंड होती की, दुचाकी अक्षरशः 20-30 फूट दूर फेकली गेली, आणि शेळके यांना काहीही शुद्धीवर येण्याची संधीच मिळाली नाही. सागर धस पुण्याच्या दिशेने जात असताना, कामरगाव परिसरात ही जीवघेणी घटना घडली.

सुपा पोलीस ठाण्याकडून अपघातप्रकरणाचा तपास सुरू असला तरी राजकीय वजनामुळे तपासाला ब्रेक लागेल का?, असा सवाल संतप्त नागरिक विचारू लागले आहेत. घटनास्थळी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आमदार सुरेश धस यांचे पुत्र असल्यामुळे सागर धस यांच्यावर कोणताही दबाव न आणण्याची शक्यता नागरिकांना सतावत आहे. आष्टी व बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत."कायद्याचं राज्य असेल, तर मग दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे," अशी मागणी अनेकांकडून होत आहे.

शेअर करा