मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधानपरिषदेत भावूक! "अरे संसार संसार…" म्हणताना दाटला कंठ; महिला सक्षमीकरणाचा मांडला 'रोडमॅप'

Sunetra Pawar Latest News : दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांचे सभागृहात पहिलेच भाषण; 'शक्ती कायदा' आणि 'लवकर या, लवकर जा' संकल्पनेवर भर

V
Vivek

2 मिनिट वाचन

Baramati Lok Sabha Election : कन्हेरीच्या मारोती मंदिरात नाराळ फोडत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात

Sunetra Pawar Latest News : दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांचे सभागृहात पहिलेच भाषण; 'शक्ती कायदा' आणि 'लवकर या, लवकर जा' संकल्पनेवर भर

मुंबई :- विधानपरिषदेच्या सभागृहात आज एक अभूतपूर्व आणि हृदयद्रावक प्रसंग पाहायला मिळाला. राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची धुरा साभाळणाऱ्या सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांनी आज सभागृहात आपले पहिलेच भाषण केले. हे केवळ एक राजकीय भाषण नव्हते, तर त्यामध्ये एका पत्नीची वेदना आणि एका महिला नेत्याचा राज्यातील भगिनींसाठी असलेला आश्वासक 'रोडमॅप' स्पष्टपणे जाणवत होता. महिला सक्षमीकरणावर बोलताना भाषणाच्या शेवटी त्यांना अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण सभागृह काही काळ स्तब्ध झाले.

बहिणाबाईंच्या ओळी आणि दाटलेला कंठ

आपल्या भाषणाची सांगता करताना सुनेत्रा पवार यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अजरामर ओळी उद्धृत केल्या. "अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर… आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर…" या ओळी म्हणताना त्यांचा आवाज जड झाला आणि डोळ्यांत अश्रू तरळले. "या ओळीत स्त्रियांच्या सहनशीलतेची आणि कष्टाची मोठी ताकद दडलेली आहे," असे सांगताना त्यांना हुंदका अनावर झाला. त्यांच्या शेजारी बसलेल्या मंत्री अदिती तटकरेही हे दृश्य पाहून भावूक झाल्या. पतीच्या निधनानंतरची वैयक्तिक पोकळी आणि राज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी, अशा दुहेरी संघर्षाचे प्रतिबिंब त्यांच्या या भावूक क्षणांमध्ये उमटले होते.

महिलांसाठी 'लवकर या, लवकर जा'चा नवा मंत्र

केवळ भावूक न होता सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी ठोस कृती आराखडाही मांडला. नोकरी करणाऱ्या महिलांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा विचार करून त्यांनी ‘लवकर या, लवकर जा’ (Flexible Timing) ही अभिनव संकल्पना राबवण्याची घोषणा केली. यामुळे नोकरी आणि घर यांचा मेळ घालणे महिलांना सोपे जाणार आहे. विशेषतः मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना विशेष सवलती देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'शक्ती' कायद्यासाठी सरकारची कटीबद्धता

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना, प्रलंबित असलेला ‘शक्ती कायदा’ लवकरात लवकर संमत करण्यासाठी शासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. "यंदाचे वर्ष हे 'महिला वर्ष' म्हणून साजरे केले जाईल आणि प्रत्येक स्त्रीला सन्मान, संधी आणि सुरक्षितता मिळवून देणारा समाज घडवणे हाच आपला संकल्प आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शेअर करा