मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pimpari News : बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Pimpari News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पिंपरी-चिंचवड ही केवळ उद्योगनगरी नसून राज्याच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Pimpari News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पिंपरी-चिंचवड ही केवळ उद्योगनगरी नसून राज्याच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. त्यामुळे या शहराची आरोग्य व्यवस्था सक्षम आणि आधुनिक असणे आवश्यक आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाने आरोग्य क्षेत्रात सुरू केलेल्या विविध उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.https://maharashtramirror.com/ Pimpari news

डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील बहुअवयव प्रत्यारोपण केंद्र, माता व बाल संगोपन विभागातील ‘आई व गोकुळ’, तसेच कृत्रिम गर्भधारणा आणि एंडोस्कोपी केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, महाविद्यालयाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. एन. जे. पवार, डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त यशराज पाटील यांच्यासह डॉक्टर्स, विद्यार्थी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ pimpari news

उपमुख्यमंत्र्यांकडून डी. वाय. पाटील समूहाचा गौरव

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, डी. वाय. पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या कर्तृत्वातून उभे राहिलेले शैक्षणिक व वैद्यकीय विश्व आज हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि लाखो रुग्णांना आरोग्यसेवा देत आहे. आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आरोग्यसेवा ही केवळ सुविधा उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित नसून समाजाप्रती असलेली मोठी जबाबदारी आहे. या भावनेतून डी. वाय. पाटील समूहाचे कार्य सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे. आधुनिक आरोग्य व्यवस्था म्हणजे केवळ अत्याधुनिक उपकरणे नव्हेत, तर अचूक निदान, योग्य उपचार, संशोधन, प्रशिक्षण, रुग्णांचे समुपदेशन आणि माणुसकीपूर्ण सेवा यांचा समन्वय होय, असेही त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि नीटनेटकेपणासह रुग्णांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. येथे मोठ्या संख्येने रुग्णांना आरोग्यसेवा दिली जात असून, वैद्यकीय तंत्रज्ञानातील बदलांचा स्वीकार करून विविध गंभीर आजारांवर आधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत, ही उल्लेखनीय बाब आहे.

अत्याधुनिक उपचार आणि सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्यसेवा यांचा समतोल साधणे ही आजच्या काळाची गरज आहे. रुग्णांचा वेळ आणि पैसा वाया जाऊ नये, हीच आरोग्यसेवेची खरी दिशा असली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले.

या वेळी मराठी साहित्य परिषदेने डॉ. पी. डी. पाटील यांची अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दर्जेदार आरोग्यसेवेसाठी शासनाचा आग्रह : प्रकाश आबिटकर


सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने भविष्यातील आरोग्यविषयक गरजा ओळखून सुरू केलेल्या बहुअवयव प्रत्यारोपण केंद्र, ‘आई व गोकुळ’, कृत्रिम गर्भधारणा आणि एंडोस्कोपी केंद्रामुळे पुणे शहरासह महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या केंद्रांमधून अत्यंत महत्त्वपूर्ण, आवश्यक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील काम ‘स्टेट ऑफ द आर्ट’ असून, सामान्य नागरिकांना शासनाच्या तसेच खासगी रुग्णालयांमध्ये अधिकाधिक दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी शासन आग्रही आहे. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या डी. वाय. पाटील रुग्णालयाचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. स्वर्गीय डी. वाय. पाटील यांचा वारसा पुढील पिढी समर्थपणे पुढे नेत असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. भाग्यश्री पाटील यांनी प्रास्ताविकात डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या स्थापनेपासून झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विद्यापीठ व रुग्णालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा