पिंपरी-चिंचवड शहरात आज अचानक इंधनाचा तुटवडा
कोणतीही पूर्वकल्पना न देता पंप बंद केल्यामुळे नागरिकांचे हाल
PG
Prashik Ghaste
1 मिनिट वाचन

कोणतीही पूर्वकल्पना न देता पंप बंद केल्यामुळे नागरिकांचे हाल
पिंपरी: आखाती युद्धाचे परिणाम आता पिंपरी चिंचवड शहरात दिसू लागले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंप चालकांनी बंद ठेवले आहेत. पेट्रोल पुरवठा करणाऱ्या हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम सारख्या सरकारी कंपन्यांकडून पुरेशा प्रमाणात इंधन पुरवठा न झाल्याने, पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ मालकांवर ओढवली आहे.

राज्य सरकार तसेच पेट्रोल पंप मालकांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक पेट्रोल पंप बंद ठेवल्याने याचा मोठा फटका पिंपरी चिंचवड शहरातील नोकरदार आणि कामगारांना बसला आहे.
पिंपरी-चिंचवड न्युज




