मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : 'एस.टी. संगे तीर्थाटन' : स्वारगेट आगारातर्फे धार्मिक व पर्यटन सहलींचे आयोजन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिररः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) स्वारगेट आगाराकडून प्रवाशांसाठी 'एस.टी.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

'एस.टी. संगे तीर्थाटन' : स्वारगेट आगारातर्फे धार्मिक व पर्यटन सहलींचे आयोजन ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास
'एस.टी. संगे तीर्थाटन' : स्वारगेट आगारातर्फे धार्मिक व पर्यटन सहलींचे आयोजन ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास

Pune News : ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिररः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) स्वारगेट आगाराकडून प्रवाशांसाठी 'एस.टी. संगे तीर्थाटन' ही विशेष योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीत तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना पूर्णपणे मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी या सहलींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात विविध पर्यटन व धार्मिक स्थळांच्या सहली आयोजित करण्यात आल्या आहेत.
• एक दिवसीय सहली: कासपठार व ठोसेघर (२, ४ व ७ ऑक्टोबर), सज्जनगड दर्शन (३ ऑक्टोबर), शिवथरघळ (४ व १० ऑक्टोबर) आणि गोंदवले दर्शन (२४ सप्टेंबर, ४ व २४ ऑक्टोबर).
• दोन दिवसीय सहली: कोकण दर्शन - दिवेआगार, हरिहरेश्वर (२ ऑक्टोबर), अष्टविनायक दर्शन (२४ ते २५ ऑक्टोबर), गाणगापूर, तुळजापूर व अक्कलकोट (२८ ते २९ ऑक्टोबर) आणि बाळूमामा आदमापूर, कोल्हापूर (३० ते ३१ ऑक्टोबर).
• दीर्घकालीन सहली (४ रात्री, ५ दिवस): शेगाव, माहूर व लोणार (२२ व २६ ऑक्टोबर), महाकाल दर्शन - उज्जैन, ओंकारेश्वर (२९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर) आणि निळकंठ धाम, गरुडेश्वर - गुजरात (१२ ते १६ नोव्हेंबर).
• या सहलींच्या अधिक माहितीसाठी व पूर्वआरक्षणासाठी राजू सरकाळे (९९२३५६२५२४) किंवा संतोष सपकाळ (८९४९०२८००१) यांच्याशी संपर्क साधावा.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा