मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Baramati News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांची बाजी; संचालक मंडळाचे अंतिम निकाल जाहीर

Baramati News :बारामती (पुणे) : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत.

VK
Vikrant Kulkarni

3 मिनिट वाचन

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांची बाजी; संचालक मंडळाचे अंतिम निकाल जाहीर
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांची बाजी; संचालक मंडळाचे अंतिम निकाल जाहीर

Baramati News :बारामती (पुणे) : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सोमवारी रात्री उशिरा निकाल घोषित केले. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना यश मिळाले असून, अजित पवार यांच्या निधनानंतर त्या पहिल्यांदाच थेट निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या.https://maharashtramirror.com/ baramati news

निवडणुकीच्या निकालानंतर जय पवार यांनी रात्री उशिरा अजित पवार यांच्या स्मारकस्थळी जाऊन अभिवादन केले. या निवडणुकीत सभासद शेतकरी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल सुनेत्रा पवार यांनी आभार व्यक्त केले.

‘सभासदांचा विश्वास हीच आमची ताकद’

निवडणुकीतील यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “या निवडणुकीत सभासद शेतकरी बांधव-भगिनींनी दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत हीच आमची ताकद आहे. सर्वांना सोबत घेऊन सभासदांचे हित जपणे, शेतकऱ्यांची समृद्धी साधणे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची प्रगती अधिक गतिमान करणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

कोणत्या गटातून कोण विजयी? जाणून घ्या सविस्तर निकाल
१. उत्पादक सभासद प्रतिनिधी – निंबुत-खंडाळा (गट क्र. १)
एकूण वैध मते : २२,७५७
अवैध मते : ४९९
विजयी उमेदवार :

काकडे प्रमोद भगवानराव – १४,९८१ मते
काकडे प्रियराज उर्फ अभिजित सतीशराव – १४,०४९ मते
दगडे वसंतराव रामराव – १३,९९९ मते
२. उत्पादक सभासद प्रतिनिधी – मुरुम-वाल्हा (गट क्र. २)
एकूण वैध मते : २२,७९७
अवैध मते : ४६२
विजयी उमेदवार :

शिंदे राजवर्धन शिवाजीराव – १४,०१५ मते
गायकवाड रुषीकेश (ऋषिकेश) शिवाजी – १३,९४१ मते
भोसले विक्रम आनंदराव – १३,८५४ मते
३. उत्पादक सभासद प्रतिनिधी – होळ-मोरगाव (गट क्र. ३)
एकूण वैध मते : २२,६७०
अवैध मते : ५८९
विजयी उमेदवार :

सस्ते मकरंद चंद्रकांत – १४,३१६ मते
होळकर मनिषा आनंदकुमार – १४,२२६ मते
भापकर रविंद्र जयवंतराव – १२,०७५ मते
४. उत्पादक सभासद प्रतिनिधी – कोऱ्हाळे-सुपा (गट क्र. ४)
एकूण वैध मते : २२,७३४
अवैध मते : ५२४
विजयी उमेदवार :

खलाटे अक्षय धनंजय – १४,५०० मते
बोरकर राजेंद्र हरिभाऊ – १३,८९६ मते
भगत सुनिल नारायण – १३,७४६ मते
५. उत्पादक सभासद प्रतिनिधी – मांडकी-जवळार्जुन (गट क्र. ५)
एकूण वैध मते : २२,७४५
अवैध मते : ५१३
विजयी उमेदवार :

जगताप सतीश संपत – १४,६४७ मते
धुमाळ उत्तम महादेव – १३,८७० मते
टेकवडे सुधाकर ज्ञानोबा – १३,८१९ मते
६. महिला राखीव प्रतिनिधी गट
एकूण वैध मते : २३,०११
अवैध मते : ३७३
विजयी उमेदवार :

खोमणे प्रणिता मनोज – १४,३५६ मते
नाझीरकर छबुताई अंकुश – १३,५८३ मते
७. इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रतिनिधी गट
एकूण वैध मते : २२,७८८
अवैध मते : ५९२
विजयी उमेदवार : रासकर शैलेंद्र पंढरीनाथ – १४,५७७ मते

८. भटक्या-विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गट
एकूण वैध मते : २२,७८८
अवैध मते : ५९२
विजयी उमेदवार : धायगुडे अशोक चंद्रकांत – १४,५४० मते

९. अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी गट
एकूण वैध मते : २२,६२९
अवैध मते : ७४४
विजयी उमेदवार : साळवे व्दारकोजीराव गुलाब – १४,०६४ मते

१०. ‘ब’ वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गट
विजयी उमेदवार : सोरटे संग्राम तानाजी – १३० मते

शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचे आव्हान
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता नवनिर्वाचित संचालक मंडळासमोर सभासदांचे हित जपणे, शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणे आणि कारखान्याची प्रगती साधण्याचे महत्त्वाचे आव्हान असेल. शेतकऱ्यांचा विश्वास कायम राखत कारखान्याचा कारभार अधिक प्रभावीपणे चालविण्यावर नव्या संचालक मंडळाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा