मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Social Media Star Nirmla Navle : सोशल मीडिया स्टार निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का! कारेगाव गणात 'रिल्स'ची जादू ओसरली; भाजपच्या मनीषा पाचंगेंचा विजय

Pune Shirur ZP Election News: अतिशय चुरशीच्या लढतीत 300 मतांनी पत्करावी लागली हार; 'इन्स्टाग्राम'वरील लोकप्रियतेपेक्षा भाजपची रणनीती ठरली सरस

V
Vivek

1 मिनिट वाचन

Social Media Star Nirmla Navle : सोशल मीडिया स्टार निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का! कारेगाव गणात 'रिल्स'ची जादू ओसरली; भाजपच्या मनीषा पाचंगेंचा विजय

Pune Shirur ZP Election News: अतिशय चुरशीच्या लढतीत 300 मतांनी पत्करावी लागली हार; 'इन्स्टाग्राम'वरील लोकप्रियतेपेक्षा भाजपची रणनीती ठरली सरस

शिरूर/पुणे | पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यक्तिमत्व निर्मला नवले यांना शिरूर पंचायत समितीच्या निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. कारेगाव-कान्हूर मेसाई गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार असलेल्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी सुमारे 300 मतांच्या फरकाने पराभव केला. सोशल मीडियावर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या नवलेंचा हा पराभव सध्या पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकप्रियता विरुद्ध प्रत्यक्ष राजकारण

आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले यांनी काही वर्षांपूर्वी कारेगावच्या सरपंचपदाची धुरा सांभाळली होती. सरपंच असताना त्यांनी केलेली विकासकामे आणि सोशल मीडियावर त्यांच्या 'रिल्स'मुळे त्या राज्यभर प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या वक्तव्यांची आणि स्टाईलची नेहमीच चर्चा असायची. मात्र, पंचायत समितीच्या या मोठ्या निवडणुकीत केवळ सोशल मीडियावरील लोकप्रियता त्यांना तारू शकली नाही. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी स्थानिक प्रश्नांवर भर देत आणि भाजपच्या संघटनात्मक शक्तीच्या जोरावर नवलेंच्या लोकप्रियतेवर मात केली.

पुणे जिल्हा परिषदेतील सद्यस्थिती

निर्मला नवले यांचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असला, तरी पुणे जिल्ह्यात इतर ठिकाणी पक्षाला 'सहानुभूती' मिळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात प्रचार थंडावला होता, मात्र आतापर्यंत हाती आलेल्या 73 जागांच्या कलानुसार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 27 जागांवर आघाडी/विजय

भारतीय जनता पक्ष (भाजप): 20

जागांवर आघाडी/विजय

शिवसेना (शिंदे गट): 07 जागा

शिवसेना (ठाकरे गट): 02 जागा

राष्ट्रवादी (शरद पवार गट): 03 जागा

अजितदादांच्या निधनाचा परिणाम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कोणतीही मोठी सभा झाली नव्हती. कार्यकर्त्यांमध्ये काहीसे नैराश्य असूनही, ग्रामीण भागात राष्ट्रवादीला सहानुभूतीचे मतदान होताना दिसत आहे. असे असतानाही, निर्मला नवले यांच्यासारख्या तगड्या आणि लोकप्रिय उमेदवाराचा पराभव होणे हे राष्ट्रवादीसाठी चिंतन करायला लावणारे आहे.

शेअर करा