मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Social & Crime News : दूध भेसळ प्रकरणातील आणखी एक फरार आरोपी गजाआड

पुणे, महाराष्ट्र मिरर Social & Crime News : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या दूध भेसळ प्रकरणात मंचर पोलिसांना आणखी एक फरार आरोपीला गजाआड केले असून, या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे.

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

Social & Crime News : दूध भेसळ प्रकरणातील आणखी एक फरार आरोपी गजाआड

आरोपीला ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी; अटक केलेल्या आरोपींची संख्या चौदावर

पुणे, महाराष्ट्र मिरर Social & Crime News : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या दूध भेसळ प्रकरणात मंचर पोलिसांना आणखी एक फरार आरोपीला गजाआड केले असून, या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे. न्यायालयाने आरोपीला ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.Social & Crime News

सचिन अंकुशराव सपकाळ (वय २८, रा. जळगाव सपकाळ, ता. भोकरदन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाई दूध भेसळीचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात ५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.Social & Crime News

या गुन्ह्यात मंचर, शिरूर, जुन्नर, खेड, उरळीकांचन, तसेच माळशिरस, राहुरी, श्रीरामपूर आणि सिल्लोड येथील मिळून २६ आरोपींचा समावेश आहे. यापूर्वी प्रमुख आरोपी सुशांत बबनराव हिंगे, संदीप लोढा (मंचर) आणि हेमंत टेके (अकलूज) यांच्यासह तेरा जणांना अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास वेगाने करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे फरार असलेल्या सचिन सपकाळला गुरुवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली.Social & Crime News

दरम्यान, या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरू असून, दूध भेसळ रॅकेटची संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी तपास यंत्रणा विविध अंगांनी चौकशी करत आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलातील सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, दूध भेसळ प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी एसआयटीकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. सचिन सपकाळ याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोधही युद्धपातळीवर सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल.”Social & Crime News

Social & Crime News

शेअर करा