Pune news : सिंहगड रोडवर हायवा ट्रकच्या धडकेत १७ वर्षीय मोटारसायकलस्वार ठार
Pune news : पुणे: नांदेडसिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंहगड रोडवरील रामेश्वर मंदिरासमोर भरधाव आणि हयगयीने चालवलेल्या हायवा ट्रकने मोटारसायकलस्वार १७ वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिली.
1 मिनिट वाचन

Pune news : पुणे: नांदेडसिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंहगड रोडवरील रामेश्वर मंदिरासमोर भरधाव आणि हयगयीने चालवलेल्या हायवा ट्रकने मोटारसायकलस्वार १७ वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तरुण जागीच गंभीर जखमी होऊन मयत झाल्याची दुर्देवी घटना घडली.https://maharashtramirror.com/ Pune news
याप्रकरणी बेबी राजु लोखंडे (वय ३८ वर्षे, रा. नऱ्हे) यांनी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:२० वाजेच्या सुमारास सिंहगड रोडवरील नांदेड फाटा ते खडकवासला जाणारे रस्त्यावरील रामेश्वर मंदिरासमोर हा अपघात घडला. आरोपी चालक लक्ष्मण दिगंबर गायकवाड (वय ४९ वर्षे, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रोड, पुणे; मूळ रा. माड्डी वस्ती, भवानी पेठ, दक्षिण सोलापूर, सोलापूर) हा त्याच्या ताब्यातील हायवा ट्रक वाहतुकीच्या सर्व नियमांकडे दुर्लक्ष करून अत्यंत हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवून नेत होता.
या भरधाव ट्रकने फिर्यादी यांचा मुलगा मोटारसायकलस्वार प्रथमेश राजु लोखंडे (वय १७ वर्षे) यांस जबर ठोस मारली. या अपघातात प्रथमेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम १०६(१), २८१, मोटार वाहन कायदा (मोव्हेॲक्ट) कलम १८४, ११९/१७७, १३४ (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे करीत आहेत.




