मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

आयटी हब हिंजवडीत धक्कादायक घटना: 23 वर्षीय इंजिनीअरची आत्महत्या

•'मला माफ करा' असे लिहून पियुष कवडेने संपवले आयुष्य, हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरू

V
Vivek

1 मिनिट वाचन

आयटी हब हिंजवडीत धक्कादायक घटना: 23 वर्षीय इंजिनीअरची आत्महत्या

•'मला माफ करा' असे लिहून पियुष कवडेने संपवले आयुष्य, हिंजवडी पोलिसांकडून तपास सुरू

पुणे :- पुणे जिल्ह्यातील आयटी हब हिंजवडीमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हिंजवडी फेज वन येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 23 वर्षीय पियुष अशोक कवडे या तरुण आयटी इंजिनीअरने आज सकाळी कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने आयटी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. Pune Engineer Suicide आत्महत्येपूर्वी पियुषने एक सुसाईड नोट लिहिली असून, त्यात त्याने आयुष्यात सर्वत्र अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. Pune Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष कवडे गेल्या एक वर्षापासून ॲटलस कंपनीत आयटी इंजिनीअर म्हणून कार्यरत होता. आज सकाळी तो एका मीटिंगमध्ये सहभागी होता. मीटिंग सुरू असतानाच त्याला अचानक छातीत दुखू लागल्याचे सांगून तो बाहेर आला. त्यानंतर काही वेळातच त्याने थेट सातव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पियुषने लिहिलेली सुसाईड नोट मिळाली. या नोटमध्ये त्याने "मी आयुष्यात सगळ्या ठिकाणी अपयशी ठरलो आहे. मला माफ करा" अशा आशयाचे वाक्य लिहून आपले जीवन संपवले.

या घटनेबाबत माहिती देताना हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, "सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. पियुष अशोक कवडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली सुसाईड नोट आम्हाला मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे."

शेअर करा