Pune News : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने शिवण्यातील व्यक्तीची फसवणूक
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : सॅम्को कंपनीच्या शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने शिवण्यातील ३६ वर्षीय व्यक्तीची ८ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
1 मिनिट वाचन

Pune News : तब्बल चार लाख रुपये उकळल्याची तक्रार
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : सॅम्को कंपनीच्या शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने शिवण्यातील ३६ वर्षीय व्यक्तीची ८ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पैसे हस्तांतरित करून घेतल्यानंतर कोणताही परतावा दिला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी संबंधित व्यक्तीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, मोबाईलधारक, बँक खातेधारक आणि वापरकर्त्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, २४ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून हा प्रकार घडला. मोबाईलधारकाने सॅम्को कंपनीच्या शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले. मात्र, गुंतविलेल्या रकमेवर कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक केली. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोळकोटगी तपास करीत आहेत.




