मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : शिरूरमध्ये घरात शिरलेल्या चोरट्याचा गोळीबार; एक गंभीर

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : आनंद सोसायटीतील घरात शिरलेल्या चोरट्याने मोबाईल चोरल्यानंतर घरमालकाच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

शिरूरमध्ये घरात शिरलेल्या चोरट्याचा गोळीबार; एक गंभीर
शिरूरमध्ये घरात शिरलेल्या चोरट्याचा गोळीबार; एक गंभीर

Pune News : घरमालकावर पिस्तुलातून गोळी झाडल्याची तक्रार; मुलीलाही जखमी केले

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : आनंद सोसायटीतील घरात शिरलेल्या चोरट्याने मोबाईल चोरल्यानंतर घरमालकाच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. चोरट्याने त्यांच्या मुलीलाही जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
याप्रकरणी जखमी उमेश चंदनमल छाजेड (वय ४३, रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंदाजे २० ते २५ वर्षांच्या अनोळखी चोरट्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, चोरी आणि भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, चोरट्याने स्वयंपाकघराच्या लोटलेल्या दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर छाजेड यांच्या आईचा मोबाईल चोरला. ‘आता तुला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी देऊन छाजेड यांच्या डोक्याचा निशाणा धरत त्यांच्या दिशेने पिस्तुलातून एक गोळी झाडल्याचा आरोप आहे. यात छाजेड गंभीर जखमी झाले आहेत.
चोरट्याने छाजेड यांच्या मुलीच्या हाताला बोचकारून तिलाही जखमी केले. तसेच शेजारी राहणारे अजित शेठ ओसवाल यांच्या घरी घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नकाते पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा