मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar-Ajit Pawar : शरद पवार-अजित पवार एकत्र जेवणार! - पवारांनी वाढदिवसानिमित्त अजितदादा आणि प्रफुल्ल पटेलांना स्नेहभोजनाचे दिले निमंत्रण

Sharad Pawar Birthday : दिल्लीतील निवासस्थानी होणार भेटीगाठी; 'महाविकास आघाडी'च्या सर्व खासदारांनाही आमंत्रण; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit-Pawar-and-Sharad-Pawar

Sharad Pawar Birthday : दिल्लीतील निवासस्थानी होणार भेटीगाठी; 'महाविकास आघाडी'च्या सर्व खासदारांनाही आमंत्रण; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुंबई :- राज्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण तापले असतानाच राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या दोन वेगवेगळ्या राष्ट्रवादी पक्षांमध्ये असलेले खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच एकाच व्यासपीठावर एकत्र दिसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि अजित पवार गटाचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

स्नेहभोजनाचे निमंत्रण

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी दोन दिवसांनी असलेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आयोजित केला आहे.या कार्यक्रमासाठी शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना आणि महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे.

विशेष म्हणजे, यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही नेते देखील आहेत. शरद पवार यांनी स्वतःहून प्रफुल्ल पटेल यांना फोन करून निमंत्रण दिले आहे, ज्यामुळे पटेल या स्नेहभोजनासाठी उपस्थित राहणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता असून, ते या स्नेहभोजनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय चर्चांना उधाण

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीचे सर्व खासदार, नेते, तसेच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येण्याची शक्यता असल्याने दोन्ही राष्ट्रवादी पक्ष भविष्यात एकत्र येतील का, याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या भेटीबाबत, 'ही फक्त स्नेहभोजनाचीच भेट आहे', असे अजित पवार यांच्या पक्षाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, राज्याच्या राजकारणाची दिशा काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेअर करा