मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

भोसरीत तीन अल्पवयीन मुलींवर सुरक्षारक्षकाचा अत्याचाराचा प्रयत्न

चिमुरडीच्या धाडसामुळे नराधमाला बेड्या

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

भोसरीत तीन अल्पवयीन मुलींवर सुरक्षारक्षकाचा अत्याचाराचा प्रयत्न

चिमुरडीच्या धाडसामुळे नराधमाला बेड्या

पाण्याची टाकी दाखविण्याच्या आमिषाने सातव्या मजल्यावर नेले; नोकरीच्या पहिल्याच दिवशी सुरक्षा रक्षकाचे संतापजनक कृत्य

पिंपरी-चिंचवडमधील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या नराधम सुरक्षा रक्षकानेच माणुसकीला काळिमा फासल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. एका १० वर्षांच्या मुलीने वेळीच दाखवलेल्या धैर्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि आरोपी गजाआड झाला.

शुक्रवारी (दि. ८) दुपारी ही घटना घडली. दिनेश चौधरी (वय २५) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. त्याने ६ ते १० वर्षे वयोगटातील चार मुलींना 'तुम्हाला पाण्याची टाकी दाखवतो' असे आमिष दाखवले. तो या मुलींना इमारतीच्या सातव्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे त्याने त्यांच्याशी अश्लील चाळे करत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

हे कृत्य केल्यानंतर आरोपीने मुलींना प्रचंड घाबरवले होते. "हा प्रकार कोणाला सांगितला, तर मारून टाकेन," अशी धमकी त्याने चिमुरड्यांना दिली. या भीतीमुळे मुली धास्तावल्या होत्या. मात्र, १० वर्षांच्या धाडसी मुलीने न घाबरता ही बाब आपल्या आईला सांगितली. पालकांनी विलंब न लावता पोलिसांत धाव घेतल्याने गुन्हा नोंदवण्यात आला.

आरोपी दिनेश चौधरी याचा त्या सोसायटीतील कामाचा तो पहिलाच दिवस होता. यापूर्वी त्याने एका एजन्सीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम केले आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून या नराधमाला बेड्या ठोकल्या.

ज्यांच्या भरवशावर मुले सोसायट्यांमध्ये खेळतात, तोच रक्षक भक्षक निघाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा नराधमांना कडक शासन करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

शेअर करा