मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरण: 'निंबाळकरांनाही चौकशीच्या कक्षेत आणा' - सुषमा अंधारेंची मागणी

Satara Doctor Suicide Case : 'माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर ताकदीचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करतात'; वर्षा-हर्षा हगवणे प्रकरणाचा दिला दाखला

V
Vivek

1 मिनिट वाचन

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरण: 'निंबाळकरांनाही चौकशीच्या कक्षेत आणा' - सुषमा अंधारेंची मागणी

Satara Doctor Suicide Case :'माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर ताकदीचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करतात'; वर्षा-हर्षा हगवणे प्रकरणाचा दिला दाखला

पुणे :- फलटण येथील महिला डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत, या प्रकरणात भाजपचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचेही नाव घेतले जात असून, निंबाळकर यांनाही चौकशीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी केली आहे. तसेच, तपासाची कक्षा वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Satara Doctor Suicide Case Latest News

आपल्या बोलण्याला कोणताही आधार नाही, असे सांगितले जात असल्याचा उल्लेख करत अंधारे यांनी सातारा डॉक्टर महिलेने आरोग्य विभागाचे वरिष्ठ डॉ. अंशुमन धुमाळ यांना लिहिलेली पत्रे पुरावे म्हणून सादर केली. या पत्रांच्या आधारावर त्यांनी डॉ. अंशुमन धुमाळ, खासदारांचे दोन पीए, एपीआय झायपात्रे, पीएसआय पाटील, तसेच रणजितसिंह निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली.

खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप

रणजितसिंह निंबाळकर हे आपल्या ताकदीचा गैरवापर करून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्रास देत असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला. अनेक गुन्हे त्यांच्या प्रभावाखालीच दाखल होतात, असेही त्या म्हणाल्या. या आरोपांना बळ देण्यासाठी अंधारे यांनी वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणाचा दाखला दिला. या दोघींनीही आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात निंबाळकर यांचा अनेकदा उल्लेख होता, असा दावा अंधारे यांनी केला आणि ती सुसाईड नोट वाचूनही दाखवली.

चाकणकर यांच्यावर टीका

यावेळी अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, महिला आयोगाला मृत डॉक्टर महिलेचे चारित्र्य हनन करण्याचा कोणताही अधिकार नाही. जर महिलांचा एवढाच पुळका असेल तर वर्षा आणि हर्षा हगवणे यांच्या प्रकरणात चाकणकर यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'चाकणकर यांना भाजपमध्ये उडी मारायची आहे म्हणून हे सगळं चालू आहे का?' असे विचारत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांना कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा सल्लाही दिला.

शेअर करा