मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : सर्वपित्री अमावस्येला ८२ बेवारस अस्थींचे विसर्जन

Pune News :पुणे : मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीच्या अस्थींचे विधिवत विसर्जन व्हावे, या माणुसकीच्या भावनेतून राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने बेवारस मृतांच्या अस्थींचे पूजन करून विसर्जन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

सर्वपित्री अमावस्येला ८२ बेवारस अस्थींचे विसर्जन
सर्वपित्री अमावस्येला ८२ बेवारस अस्थींचे विसर्जन

Pune News : राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम; यंदा १६ वे वर्ष

Pune News :पुणे : मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीच्या अस्थींचे विधिवत विसर्जन व्हावे, या माणुसकीच्या भावनेतून राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने बेवारस मृतांच्या अस्थींचे पूजन करून विसर्जन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. सर्वपित्री अमावस्येनिमित्त यंदा ८२ बेवारस अस्थींचे विधिवत पूजन करून नदीत विसर्जन करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News

राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदा १६ वे वर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाट येथे या अस्थींचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी मंदार रांजेकर, सदाशिव कुंदेन आणि अमर लांडे उपस्थित होते.

सदाशिव कुंदेन म्हणाले, हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार, मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केल्याने आत्म्यास शांती व मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे. मात्र, अपघात किंवा अन्य कारणांमुळे मृत्युमुखी पडलेल्या काही व्यक्तींची ओळख पटत नाही. अशा मृतांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी त्यांचे नातेवाईक उपलब्ध नसतात. त्यामुळे या मृतांनाही सन्मानाने अखेरचा निरोप मिळावा आणि त्यांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला हा उपक्रम राबविण्यात येतो.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा