मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : संतोष पंडितला जामीन मंजूर; कारागृहातून सुटका

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर संतोष पंडित यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

संतोष पंडितला जामीन मंजूर; कारागृहातून सुटका
संतोष पंडितला जामीन मंजूर; कारागृहातून सुटका

Pune Crime : आक्षेपार्ह व्हिडिओ आणि बदनामीकारक शब्द वापरल्याप्रकरणी झाली होती अटक; १४ दिवस होते न्यायालयीन कोठडीत

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर संतोष पंडित यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्यांचा जामीन मंजूर झाल्याने कारागृहातून त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणे तसेच बदनामीकारक शब्दांचा वापर केल्याच्या आरोपावरून संतोष पंडित यांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुरुवातीला न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.https://maharashtramirror.com/ Pune crime

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पंडित यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका होणार आहे.दरम्यान, पंडित यांच्यावरील आरोपांबाबत पुढील तपास सुरू असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा