मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjog Waghere Patil : स्व. लोकनेते दि.बा.पाटील यांना अभिवादन करून संजोग वाघेरे पाटील यांचा उरण प्रचारदौरा सुरु !

उरण (जितीन शेट्टी):- मावळ लोकसभा मतदार संघातील उरण तालुक्यातील जासई येथून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभेचे Mawal Lok Sabha Election उमेदवार संजोग वाघेरे पाटील Sanjog Waghere Patil यांचा उरण तालुका प्रचार दौरा आज सुरु झाला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

संजोग वाघेरे पाटील

उरण (जितीन शेट्टी):- मावळ लोकसभा मतदार संघातील उरण तालुक्यातील जासई येथून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभेचे Mawal Lok Sabha Election उमेदवार संजोग वाघेरे पाटील Sanjog Waghere Patil  यांचा उरण तालुका प्रचार दौरा आज सुरु झाला. स्वर्गीय दि.बा.पाटील साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून जासई पासून प्रचारास सुरवात करण्यात आली. या प्रचार दौऱ्यात संपूर्ण उरण तालुका पिंजून काढण्यात येणार आहे. जासई पासून धुतुम, वेश्वी, दिघोडे, चिरनेर, वशेणी, आवरे,गोवठणे, भेंडखळ, नवघर, पागोटे, सोनारी,पाणजे, बोकडविरा, नविनशेवा, करंजा, नागाव, केगाव व शेवटी उरण शहर वैष्णवी हॉटेल ते कोटनाका अशी रॅली करून उरण तालुका प्रचार दौऱ्याची सांगता होणार आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Update

या प्रचार दौऱ्यामधे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, शिवसेनेचे जेष्ठ नेते बबनदादा पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शेकापचे प्रितम म्हात्रे, कॉंग्रेसचे आर.सी.घरत, कॉ.भूषण पाटील, सर्व महिला आघाडीच्या नेत्या तसेच मोठ्या संखेचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा उस्फुर्त पाठींबा पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे Maharashtra Lok Sabha Election Live Update

शेअर करा